Breaking News : एकमेकांना वाचवण्याच्या नादात पोहायला गेलेले चौघे बुडाले! नांदेड येथील धक्कादायक घटना

नांदेड - नांदेड शहरापासून जवळच असलेल्या झरी येथील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ होत आहे.

अशी घडली घटना

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, जुन्या नांदेडातील इतवारा आणि खुदबईनगर येथील पाच जण झरी येथील खदानीत पोहण्यासाठी उतरले होते. यातील तिघांना पोहणे येत नसल्याची बाबही पुढे आली आहे. एकमेकांना वाचविण्यात चौघेजण बुडाले.

Marathwada Nanded city  four youth drowned in water

यांचा झाला मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, नदीत बुडून मृत्यू झालेल्यांत काझी मोजमिल, आफन, सय्यद सिद्दीकी आणि शेख फुझायल अशी मृतांची नावे आहेत. जीवरक्षक दल आणि नांदेड महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी या खदानीतून सर्व मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी भेट दिली.

सर्व देगलूर नाका येथील रहिवाशी

19 वर्षांच्या आतील पाच मुलं पोहायला गेली होती, त्यात चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले असून अठरा फुटांपेक्षा खोल पाण्यात ते पोहायला गेले होते. सर्व जण देगलूर नाका येथील रहिवाशी मुलं आहे, ते बारावीचे स्टुडंट आहेत असं पोलिस अधिक्षक अविनाशकुमार यांनी सांगितलं

नांदेडमध्ये याआधीही घटना

नांदेड जिल्ह्यात विहीरीत पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना लोहा तालुक्यातील बेटसांगवी या गावात घडली होती. जून महिन्यातील ही दुर्दैवी घटना होती. बेटसांगवी गावातील संतोष वानखेडे आणि राजेश वानखेडे हे दोघे जण पोहण्यासाठी विहिरीत गेले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे जण बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला होता.

रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दुपारी हे दोघे जण गावातील विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. त्यानंतर दोघांन्ही विहिरीच्या पाण्यात उडी मारली. परंतु पाण्याची खोली जास्त असल्याने दोघांन्हा पोहता येत नव्हत. दोघे जण बुडू लागले. त्यावेळी कोणीही मदतीला धावले नाही. त्यामुळे दोघांचा बुडून मृत्यू झाला. दोघे ही घरी परतले नाही त्यामुळे गावकऱ्यांनी शोध घेतला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+