Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Marathwada Mukti sangram Din 2025 wishes: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनासाठी 'हे' खास 15 शुभेच्छा संदेश

Marathwada Mukti sangram Din 2025 wishes in Marathi : भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले जरी असले तरीही भारतातील काही प्रांत तेव्हा पारतंत्र्यात होते. त्यात खासकरुनन मराठवाडा आणि हैदराबाद.. निजामाची राजवट असलेल्या या प्रदेशात स्वातंत्र्याची मशाल धगधगली ती १७ सप्टेंबर १९४८ रोजी अन् निजामाच्या जुलमी राजवटीच्या जोखडातून हैदराबाद संस्थान आणि त्यात समाविष्ट असलेला मराठवाडा स्वतंत्र झाला.

Marathwada Mukti sangram Din

मराठवाड्याला देशाच्या तुलनेत एक वर्ष उशीरा स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन किंवा हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन म्हणून ओळखला जातो. मराठवाडा आधी आर्थिक, औद्योगिक आणि इतर दृष्टीने मागास समजला जात होता, पण येथील जनतेने मराठवाड्याचे नाव देशभरात उंचावले, प्रगतीचे शिखर गाठले आहे. बऱ्याच क्षेत्रात मराठवाड्यातील तरुण आता देश आणि जगात नावारुपास येत आहेत. मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामानिमित्त आपले आप्तेष्ठ, मित्र आणि सहकाऱ्यांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा तुम्ही देऊ शकता, खास १५ शुभेच्छा संदेश आपल्यासाठी देत आहोत.

तुमच्यासाठी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त १५ शुभेच्छा संदेश:

१. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आपल्या पूर्वजांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत.

२. मराठवाडा मुक्तीचा लढा हा शौर्य, त्याग आणि संघर्षाचा आदर्श आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सर्व शूरवीरांना विनम्र अभिवादन!

३. स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, मराठवाड्याला नवी दिशा मिळाली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

४. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त, त्या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र!

५. मराठवाड्याच्या भूमीने स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला. हा दिवस त्या संघर्षाची आठवण करून देतो. सर्वांना शुभेच्छा!

६. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त, मराठवाड्याच्या स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या त्यागाचे स्मरण करूया. त्यांचा आदर्श घेऊन पुढे जाऊया.

७. मराठवाड्याचे वैभव आणि शौर्याची गाथा सांगणाऱ्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

८. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा केवळ एक दिवस नाही, तर तो आपल्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे. हा दिवस साजरा करूया!

९. मराठवाडा मुक्तीसाठी लढलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांना श्रद्धांजली. त्यांच्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा!

१०. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या शूर सैनिकांना शतशः नमन. आपण त्यांचे सदैव ऋणी राहू.

११. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त, मराठवाड्याचा गौरवशाली इतिहास आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!

१२. लढ्यातून स्वातंत्र्याची मशाल पेटली, मराठवाड्याचा मुक्तीदिन उजाडला. सर्वांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

१३. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त, आपल्या इतिहासाचा सन्मान करूया आणि भविष्याचा मार्ग प्रशस्त करूया.

१४. मराठवाडा मुक्ती दिनाच्या या विशेष दिवशी, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे धैर्य आणि त्यागाला सलाम!

१५. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणाऱ्या वीरांना सलाम. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+