मराठवाड्यातील जिल्ह्यात हादरे, भूकंप आल्यास काय खबरदारी घ्याल? घ्या जाणून
छत्रपती संभाजीनगर - मराठावाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यात आज सकाळी भूंकप झाला. हा भूंकप 4.5 रिश्टर स्केल एवढ्या तिव्रतेचा होता. या सौम्य धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु भूकंप आल्यास काय खबरदारी घ्यावी हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
येथे जाणवले भूकंपाचे धक्के
मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी येथे भुकंपाची नोंद झाली. ह्या भुकंपाचे सौम्य धक्के नांदेड, परभणी, वाशिम व हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जाणवले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही गंगापूर, पैठण व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील काही गावांमध्ये भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे संबंधित तहसिलदारांनी कळविले आहे.

तथापि, या सौम्य धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. असे असले तरी भुकंपाच्या वेळी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सुचना दिल्या आहेत. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खिरोळकर यांनी काही सूचनाही नागरीकांसाठी जारी केल्या आहेत.
भूकंपावेळी सुरक्षित ठिकाणी जा
भूकंप आल्यास सर्वप्रथम नागरिकांनी घाबरुन जाता कामा नये. विशेषतः सतर्क राहावे.ज्यांनी घराच्या पत्र्याच्या छतावर आधारासाठी दगड ठेवले असतील त्यांनी ते दगड त्वरीत काढून घ्यावे.भुकंपादरम्यान घरात असल्यास सुरक्षित ठिकाणी उदाहरणार्थ टेबल, तुळई, दरवाजाची चौकट अशा ठिकाणी तुम्ही आश्रय घ्यावा. भूकंपावेळी लिफ्ट्चा वापर करु नका, दाराजवळ गर्दी करु नका.
भिंती व विजेच्या तारांपासून दूर रहा
भुकंपादरम्यान रस्त्यावर असाल तर त्वरित मोकळ्या जागी जा. उंच जुन्या सलग इमारती, भिंती व विजेच्या तारांपासून दूर रहा. रेडिओ, टिव्ही वरुन मिळणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विषयक सुचनांचे पालन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. पाणी, वीज, गॅस कनेक्शन सुरु असल्यास तात्काळ बंद करा. शोध व बचाव पथकास सहकार्य करा.
आज सकाळी जाणवला भूकंपाचा धक्का
महाराष्ट्रातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे हादरे आज सकाळी जाणवले. यामुळे या जिल्ह्यातील नागरीकांत भिती निर्माण झाली. 4.5 रिश्टर स्केल एवढी या भुकंपाची तिव्रता होती. अशी माहिती हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.












Click it and Unblock the Notifications