उद्धव आणि राज ठाकरेंच्या मोर्चाला कोण कोण येणार? जाणून घ्या सविस्तर...

राज्य सरकारच्या त्रिभाषा सूत्रातील हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रात आता विरोधाची लाट उभी राहत असून, 5 जुलै 2025 रोजी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वात एक भव्य मोर्चा निघणार आहे. गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत हा 'मराठी अस्मितेचा' मोर्चा असणार आहे.

marathi morcha mumbai


मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की, हा कोणत्याही राजकीय पक्षाचा मोर्चा नसून, फक्त 'मराठी' या मुद्द्याचा आवाज असेल. त्यामुळे या आंदोलनात साहित्यिक, कलाकार, शिक्षक, अभ्यासक, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मराठी साहित्य महामंडळ उतरले मैदानात

या आंदोलनाला आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचाही सक्रिय पाठिंबा मिळत आहे. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी याबाबत माहिती दिली असून, साहित्यिक, भाषा अभ्यासक, संस्कृती क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

यामुळे ठाकरे बंधूंच्या नेतृत्वातील या आंदोलनाला सांस्कृतिक आणि बौद्धिक क्षेत्रातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.

मनसेकडून थेट मुंबईकरांशी संपर्क

मनसेनेही या मोर्चासाठी मुंबईतील सामान्य लोकांशी थेट संवाद सुरू केला आहे. शहरातील मुख्य प्रवासी मार्ग म्हणजे लोकल ट्रेनमध्ये जाऊन मुंबईकरांना या मोर्चात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे आणि कार्यकर्ते 5 जुलैच्या मोर्चासाठी 29 जून रोजी दादर रेल्वे स्थानकात दुपारी 12 वाजता जनसंपर्क मोहिमेत उतरणार आहेत. प्रवाशांशी संवाद साधत मोर्चासाठी समर्थन मागण्यात येणार आहे.

जाहीर सभेला शिंदेंनाही निमंत्रण

दरम्यान, 29 जून 2025 रोजी 'त्रिभाषा सूत्रा'तील हिंदी सक्तीविरोधात एक महत्त्वाची जाहीर सभा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात होणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे यांना आधीच निमंत्रण देण्यात आलेलं असून, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीकडून निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+