Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद: 'मराठी लोक गंदा है' म्हणत अपमान, मग मनसैनिकांनी काय केलं पाहा

मुंबईच्या घाटकोपर येथील एका गृहनिर्माण सोसायटीत मराठी कुटुंबाला गुजराती आणि इतर अमराठी रहिवाशांकडून मांसाहाराच्या मुद्यावरून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी-गुजराती वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणात एका व्यक्तीने मराठी कुटुंबाला 'तुम मराठी लोक गंदा है', तुम्ही मच्छी-मटण खाता" असे म्हणत टोमणे मारले. यानंतर मनसे या प्रकरणात हस्तक्षेप करत सोसायटीतील रहिवाशांना मनसे स्टाइल समज दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ही घटना घाटकोपरमधील एका गृहनिर्माण सोसायटीत घडली आहे. या सोसासयटीत मराठी कुटुंबे अल्पसंख्येत आहेत आणि बहुसंख्य रहिवासी गुजराती, जैन आणि मारवाडी आहेत. या सोसायटीत मराठी कुटुंबाला त्यांच्या मांसाहाराच्या सवयींवरून हिणवण्यात आले. या सोसायटमधील शाह नावाच्या व्यक्तीने मराठी कुटुंबाला "मराठी लोक गंदा है, तुम्ही मच्छी-मटण खाता" असे म्हणत अपमान केला आहे.

mns

मनसेने दिली मनसे स्टाइल समज

या प्रकरणाची माहिती मिळताच मनसे कार्यकर्ते सोसायटीत पोहोचले. त्यावेळी मनसे नेते राज पार्टे यांनी सोसायटीच्या रहिवाशांना याबदल जाब विचारला आहे. इथे सोसायटीमध्ये 4 मराठी कुटूंब जरी राहत असली तरी जर का याठिकाणी मराठीचा मुद्दा समोर आला तर 4 हजार मराठी लोक इथे उभे राहतील आणि चांगलाच धडा शिकवतील असं राज पार्टे यांनी म्हटलं आहे. त्यावेळी शाह नावाची व्यक्ती समोर आली नाही. तसेच सोसायटीतील इतर रहिवाशांनी आम्ही मराठी विरुध्द अमराठी भेदभाव करत नाही, आम्ही मांसाहार खाण्यावर कोणतेही बंघन घालत नाही, असं म्हणत सारवासारव केली.

मुंबईत मराठी आणि गुजराती समाजातील वाद हा नवीन नाही. गेल्या काही दशकांपासून या दोन समुदायांमध्ये भाषा, संस्कृती आणि मांसाहारावरुन वाद उद्भवत आले आहेत. मराठी समाजाला "मराठी माणूस" म्हणून ओळखले जाते आणि त्यांची मांसाहारी सवय ही गुजराती समाजाच्या शाकाहारी संस्कृतीशी विसंगत मानली जाते. त्यामुळे मुंबईत अनेकदा या वादाला तोंड फुटते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+