मराठी चित्रपटसृष्टीमधून अतिशय दु:खद बातमी; अतुल परचुरे यांचे निधन, कर्करोगावरही केली होती मात
मराठी चित्रपटसृष्टीमधून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती.
अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा शूटिंगला सुरुवातही केली होती. ते अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांच्या समोर आले होते. त्यांना एका कार्यक्रमात सर्व मराठी कलाकारांनी सलामी दिली होती. पण त्यांचं आज निधन झाल्याची अत्यंत दुर्देवी बातमी समोर येत आहे. अतुल परचुरे यांनी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनमुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.

कर्करोगावरही केली होती मात
अतुल परचुरे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचारदेखील सुरु होते. उपचारानंतर ते बरेदेखील झाले होते. गंभीर आजारपणातून बरे होतं अभिनेते अतुल परचुरे यांनी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलेले पाहायला मिळाले होते. आजवर अतुल यांनी त्यांच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र मधल्या काही काळात अतुल यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला. आजारपणाशी लढा देत अतुल यांनी सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास ठेवला होता.
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट :
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 14, 2024
रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका… pic.twitter.com/RqvCuXSmCn
अनेक सिनेमांमध्ये केले काम
अतुल परचुरे यांनी अनेक अभिनेते, दिग्दर्शक, कलाकारांसह काम केले. वासूची सासु, प्रियतमा, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केले. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. याशिवाय 'जागो मोहन प्यारे' मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले.
लग्नाच्या वाढदिवशी झाले होते कॅन्सरचे निदान
लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी अतुल परचुरे न्यूझीलंड येथे गेले होते. तिथे अन्नपदार्थ खाण्याची त्यांची वासना उडाली होती. यावेळी त्यांनी डॉक्टरांची भेट घेत तब्येतीची तपासणी केली. तेव्हा डॉक्टरांच्या हावभावावरून काहीतरी गंभीर असल्याचे त्यांना जाणवले व लिव्हरमध्ये एके ठिकाणी ट्यूमर झाल्याचे समोर आले. अशी माहिती अतुल परचुरे यांनी एका पॉडकास्टमध्ये दिली होती.












Click it and Unblock the Notifications