Maratha morcha मराठा आंदोलन इफेक्ट! मुंबईत वाहतूक कोंडी! जाणून घ्या वाहतुकीतील बदल आणि पर्यायी मार्ग

Maratha morcha Traffic jam in Mumbai routes changes : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदानावर आरक्षणासाठी उपोषण आंदोलन सुरु आहे.

मराठा आरक्षण आंदोलनामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली असून, अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात उपोषणास सुरुवात केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात या आंदोलनाच्या निमित्ताने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Maratha morcha Traffic jam in Mumbai

सकाळी पाऊस अन् आंदोलनाला प्रतिसाद

आज सकाळीच पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र पावसाची तमा न बाळगता आंदोलन आझाद मैदानाच्या दिशेने मिळेल त्या वाहनाने आणि रेल्वे मार्गे आझाद मैदानाकडे दाखल झाले आहेत अजूनही आंदोलकांचे मोर्चे आझाद मैदानाकडे दाखल होत आहेत. आझाद मैदान पालिका मुख्यालय आणि सीएसटी स्थानकाचा परिसर आंदोलकांच्या गर्दीने गजबजून गेला आहे. आंदोलकांच्या गर्दीत वाढच होत आहे.

पोलिस, मुंबईकरांना सहकार्य करा

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांची अडचण होऊ नये यासाठी पोलिसांना सहकार्य करा आणि मुंबईत आणलेली वाहने पोलीस सांगतील त्या जागी पार्क करा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. राज्य सरकारने सहकार्य केलं म्हणून आपणही सरकारला सहकार्य केले पाहिजे, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे, वाहतूक पोलिसांनी मराठा आंदोलनामुळे वाहतुकीत काही बदल केले आहेत.

आंदोलनाची सद्यस्थिती:

  • मनोज जरांगे यांनी आज सकाळी १० वाजल्यापासून आझाद मैदानावर उपोषणास सुरुवात केली आहे.
  • मुंबई आणि उपनगरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
  • आज सकाळी पाऊस सुरू झाला असला तरी, आंदोलक मिळेल त्या वाहनाने आणि रेल्वेने आझाद मैदानात पोहोचत आहेत.
  • आझाद मैदान, पालिका मुख्यालय आणि सीएसटी स्थानकाचा परिसर आंदोलकांनी गजबजला आहे.

जरांगे पाटील यांचे आवाहन:

  • जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे.
  • गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
  • आंदोलकांनी आपली वाहने पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी पार्क करावीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

वाहतुकीतील बदल, मुंबईकरांसाठी पर्यायी मार्गॉ

'हे' रस्ते वाहनांसाठी बंद

  • मराठा आंदोलनामुळे वाहतूक पोलिसांनी काही मार्गांवर निर्बंध लादले आहेत.
  • देवनार आणि ट्रॉम्बे-चीता कॅम्पकडून पांजरपोळकडे जाणारी वाहने: या मार्गांवर वाहतुकीस पूर्णपणे निर्बंध आहेत.
  • सायन-पनवेल मार्गावरून मानखुर्द-पांजरपोळकडे येणाऱ्या वाहनांना पूर्ण बंदी आहे.

'हे' आहेत पर्यायी मार्ग

  • देवनार आणि ट्रॉम्बे-चीता कॅम्पकडून येणाऱ्या वाहनांसाठी: पंजाबवाडी जंक्शन येथून उजवे वळण घेऊन हेमंत करकरे गॅस पंपाकडून गोवंडी स्टेशन मार्गाने पुढे गावदेवी चौक, नीलम जंक्शन, मानखुर्द वाहतूक विभागातून आय.ओ.सी. जंक्शनमार्गे मुंबई शहरात प्रवेश करता येईल.
  • सायन-पनवेल मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी: मानखुर्द रेल्वे ब्रिज टी जंक्शन येथून डावे वळण घेऊन घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडने छेडानगरमार्गे मुंबई शहरात प्रवेश करता येईल.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+