अखेर ठरलंच! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार, नारायण गडावरुन विधानसभेचे रणशिंग फुंकणार
Manoj Jarange Patil Dusra Melava : महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी मेळावा घेण्याची अन् विचारांचं सोन लुटण्याची परंपरा आहे. शिवतीर्थावरील शिवसेनेचा मेळावा असो की पंकजा मुंडे यांच्याकडून घेतला जाणार मेळावा असो. यात आणखी एका मेळाव्याची भर पडणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचाही यंदा बीड जिल्ह्यातील नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. नुकत्याच झालेल्या मराठा समाजाच्या मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे याच मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचे देखील रणशींग फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बीड जिल्ह्यात भगवानगडावरील पंकजा मुंडे यांचा मेळावा दरवर्षी घेतला जातो. त्यात बीड जिल्ह्यात आता यंदा दोन मेळावे होणार आहेत. कारण जरांगे यांच्या मेळाव्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक आज नारायणगडावर पार पडली. या बैठकीसाठी मराठा कार्यकर्त्यांची मोठी हजेरी होती. या बैठकीमध्ये कोणत्या ठिकाणी हा दसरा मेळावा होईल त्या ठिकाणी आलेल्या लोकांची बसण्याची व्यवस्था असेल त्यानंतर पार्किंगची व्यवस्था असेल अशा सगळ्या कामाचा गावानिहाय वाटप या बैठकीमध्ये करण्यात आले आहे.
नारायणगडावरून जरांगेंनी फुंकले रणशिंग
राज्यात दसरा मेळाव्याची अनेक ठिकाणी परंपरा आहे. बीडच्या सावरगाव घाट मध्ये पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा प्रसिद्ध आहे. आता नारायणगडावर मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज नारायणगडावर मराठा समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आलीय. आज दुपारी तीन वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात होते. या बैठकीतच मनोज जरांगेंनी हा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणूक अन् जरांगेंचा मेळावा
मराठा आरक्षण प्रश्नावर महाराष्ट्रात राजकीय घटनांना वेग आलेला असताना मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे. विधानसभेच्या निवडणूका अवघ्या महिना दीड महिन्याने होण्याची शक्यता असताना मनोज जरंगे पाटील यांच्या उपस्थितीत यंदा दसरा मेळाव्याचं आयोजन केल जाणार आहे. हा मेळावा कुठे घ्यायचा? स्वरूप कसे ठेवायचे ? याबाबतचे नियोजन करण्यासाठी आज श्री क्षेत्र नगद नारायणगड येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील समन्वयक व मराठा समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या बैठकीतच मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा व ठिकाण ठरवल्याची माहिती आहे. निवडणूकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार आहे.












Click it and Unblock the Notifications