नव्या सरकारच टेन्शन वाढलं, मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार, तारीखही केली जाहीर
Manoj Jarange Patil on Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत, मनोज जरांगे पाटील यांनी आज मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे नव्या सरकारचे टेन्शन पुन्हा वाढणार आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 25 जानेवारीच्या आत सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. नाही तर 25 जानेवारी 2025 ला पुन्हा एकदा स्थगित केलेले आमरण उपोषण सुरू करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.
जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, गेली 15 ते 16 महिने मराठा आरक्षणाचा आमचा लढा सुरू आहे. आमचा समाज एकजुटीने उभे राहत मोठा लढा उभारला. पण सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही. त्यामुळे आता आम्ही आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसणार आहोत.

उपोषणाला बसण्यासाठी बळजबरी नाही
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उपोषणाला कुणी बसावं यासाठी बळजबरी नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनीच उपोषण करावे. उपोषण शक्य नसणाऱ्यांनी केवळ येऊन ताकद वाढवावी, असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
आंतरवालीतच उपोषण करणार
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यभरात आपण आंतरवाली सोडून कुठेही उपोषण करणार नाही. आपल्याला संपूर्ण ताकद ही एकाच ठिकाणी लावायची आहे. त्यासाठी महाराष्ट्रभरातील मराठा समाज बाधवांनी आंतरवालीमध्ये येत उपोषणस्थळी बसावे, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
जरांगे पाटील यांनी काय केल्या मागण्या
- सर्व मराठी समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
- राज्य सरकारने गॅझेटची अंमलबजावणी करावी.
- सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
- 83 क्रमांकाला मराठा कुणबी एक आहे. त्यामुळे कायदा लागू करावा. 1881 पासून मराठा समाज आरक्षणात आहे.
- सरकारने सांगितल्या प्रमाणे मराठा समाजातील पोरांवरील केस मागे घ्याव्यात.
- शिंदे समितीचे काम बंद आहे, त्यांना नोंदी शोधण्यासाठी काम करायला लावा. एक वर्षाची मुदतवाढ त्यांना देण्यात यावे. प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश सरकारने द्यावे.
- मराठा समाजाचे EWS आरक्षण बंद केले आहे. ते पुन्हा लागू करावे, यासह कुणबी एसीबीसी असे 3 पर्याय देण्यात यावे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications