जरांगेंचा पुन्हा महायुतीला इशारा, म्हणाले- आरक्षण द्या, नाहीतर मराठे पुन्हा तुमच्या छाडातावर बसणार
Maharashtra Assembly Election 2024 : कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय, याचं आम्हाला काही सोयरं सुतकच नाही, आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला म्हणता, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीच्या निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले. तर सरकारने आम्हाला आरक्षण द्यावे, अन्यथा आमचा उपोषणाचा मार्ग पक्का आहे, मराठे पुन्हा तुमच्या छाडावर बसायला तयार आहेत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सरकार स्थापन होऊ द्या, उपोषणाची तारीख जाहीर करू
जरांगे पाटील म्हणाले की, सरकार अन् फरकार कितीकं येऊन जातात आणि मराठे गुडघे टेकायला लावतात. आमच्यासोबत बेईमानी करायची नाही. सामूहिक आमरण उपोषण बसणार आहे. तुमचे सरकार बसले की लगेच उपोषणाची तारीख ठरवून जाहीर करणार आहोत, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

आमच्या लेकरांपासून आम्ही दूर जाऊ शकत नाही
आम्ही आमच्या लेकरांपासून दूर जाऊ शकत नाहीत. कोणाचेही सरकार येऊ द्या, त्यांचे सरकार आले आहे, त्याबाबद्दल त्यांना शुभेच्छा. मोठ्या मनाने त्यांचे अभिनंदन सुद्धा केले पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यांवर आहेत. पण मराठा अरक्षणात खोडा घालायचा नाही नाहीतर मराठे तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय राहणार नाहीत, असेही जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे फॅक्टर कळायला ह्यात जाईल
जरांगे पाटील म्हणाले की, एखाद्या गोष्टीचं श्रेय कधी घ्यावे तर मोठ-मोठे कार्यक्रम घ्यावेत आणि मग म्हणावे. हा आमच्यामुळे आला आणि तो आमच्यामुळे आला. जेवढे लोक निवडून आलेत ना त्यांच्या मागे मराठा फॅक्टर आहे, असे जरांगे म्हणाले. एखाद्या आमदाराने म्हणावे की तो मराठ्यांच्या जिवावर निवडून आला नाही. जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची हयात जाईल, तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्यांच्या नादी कशाला लागता, असेही ते म्हणाले.
मराठा मैदानातच नाही, मग आम्ही फेल कसे
मराठाच मैदानात नाही आणि काही बांडगुळं बोलत बसतेत. जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणतेत. अरे पण आम्ही मैदानातच नाही. हे सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आलेले आहे. आम्ही कुणाच्या जत्रेत जाऊन नळ्यासारखा खेळ नाही करत. लोकांच्या गर्दीत नाही जायचे आणि माझेच आहे म्हणायचे. आमच्या फॅक्टरमुळेच सरकार आले. यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.












Click it and Unblock the Notifications