मनोज जरांगे पाटलांवर दु:खाचा डोंगर; बातमी समजल्यावर पुण्याच्या मोर्चातच आले डोळ्यात पाणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी महाराष्ट्रभर सध्या मोर्चे काढले जात आहे. आज पुण्यात मोर्चा सुरु असतानाच मनोज जरांगे पाटलांना तातडीने या मोर्चातून निघून जावे लागले. जरांगे पाटील यांच्या चुलत भावाचे अचानक अपघाती निधन झाल्याचे बातमी त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी पुण्यातील मोर्चा अर्धवट सोडत जालना गाठले.

शनिवारी मास्टरमाईंड पकडला
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात शनिवारी तीन आरोपींना अटक केली. सुदर्शन घुले व सुधीर सांगळे हे दोघे पुण्यातून तर त्यांना मदत करणाऱ्या आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली. या तिघांनाही केज न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना १४ दिवासांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकारानंतर जरांगे पाटील यांनी सगळे आरोपी पुण्यातूनच कसे सापडतात, असा प्रश्न उपस्थित केला होता. शिवाय या आरोपींना मंत्रीमंडळातील कुणाचे सहकार्य आहे का, याचा शोध घेण्याची मागणीही केली होती.
पुण्यात आज मोर्चा
दरम्यान, हे सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडतात असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यात आज पुण्यात सर्वपक्षिय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी झालेल्या सर्व मोर्चामध्ये मनोज जरांगे उपस्थित होते. पुण्यातील मोर्चातही मनोज जरांगे पाटील उपस्थित होते. यापूर्वीच्या अनेक मोर्चात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. शिवाय काल त्यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरु न देण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी थेट जरांगेंनाच चॅलेंज दिले होते. या दोघांच्या वादामुळे आजच्या मोर्चात जरांगे पाटील काय बोलतात याकडे लक्ष लागले होते.
जरांगे पाटलांवर दुःखाचा डोंगर
आज पुण्याच्या मोर्चात जरांगे पाटील उपस्थित होते. मात्र मात्र हा मोर्चा त्यांनी अर्धवट सोडला आहे, आणि ते पुन्हा परतले. त्यांनी या मोर्चामध्ये आंदोलकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि मोर्चातून माघारी परतले. मोर्चा सोडण्याचे मोठे कारण आता समोर आलं आहे. ते म्हणजे जरांगे पाटील यांच्या चुलत भावाचे अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी जरांगे पाटील हे मोर्चा अर्धवट सोडून परतल्याची माहिती समोर येत आहे.












Click it and Unblock the Notifications