जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली; स्टेजवर भाषण सुरु असतानाच कोसळले, नेमके काय झाले? वाचा
बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरु असलेल्या सभेत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्बेत बिघडली. भाषण सुरु असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी काही वेळ भाषण थांबवले मात्र पुन्हा भाषण सुरु करताच ते चक्कर येऊन खाली पडले, अशी बातमी काहींनी दिली आहे. या प्रकारानंतर तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजते.

नेमकं काय झालं?
शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, केमिस्ट, वकील, इंजिनिअर आणि कर्मचारी संघटनाचा आज बीडमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर मनोज जरांगे यांच्यासह धनंजय देशमुख उपस्थित होते. परंतु भाषण सुरू केल्यानंतर अचानक जरांगे पाटलांना अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे त्यांनी काही वेळ भाषण थांबवले. भाषण संपल्यानंतर तातडीने मनोज जरांगे यांना रुग्णवाहिकेनं हॉस्पिटलला नेण्यात आलंय.
काय म्हणाले जरांगे?
संतोष देशमुख हत्या प्रकरणी या मेळाव्याच चर्चा झाली. अनेकांनी उत्स्फूर्त भाषणे केली. मनोज जरांगे भाषण ऐकतानाच गहिरवरले होते. त्यानंतर त्यांनी भाषण सुरु केले. मात्र भाषण सुरु असतानाच मला शब्दही फुटत नाही, असं म्हणत जरांगेंनी मध्येच भाषण थांबवले. त्यानंतर त्यांनी थोडावेळ थांबून पुन्हा भाषणाला सुरूवात केली. जरांगे यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने जरांगेंना रूग्णालयात दाखल केले.












Click it and Unblock the Notifications