Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विधानसभेसाठी जरांगेंची रणनीती : 'या' मतदारसंघात दिले थेट उमेदवार, तर कोणत्या ठिकाणी दिला पाठिंबा

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत राज्यभरात पाहायला मिळत आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी आज घेतलेल्या बैठकीनंतर कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार आणि कोणत्या मतदारसंघात कोणाला मदत करणार याची भूमिका स्पष्ट केली. आंतरवाली सराटीत बैठक संपल्यानंतर ते प्रेस घेऊन त्याची घोषणा देखील करणार आहेत. दरम्यान बैठकीत झालेल्या काही निर्णयाबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे.

मराठवाड्यातील या जिल्ह्यात जरांगेंचा राजकीय डाव

जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीत काही महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामधील मतदारसंघात ते उमेदवार उभे करणार आहेत. तर मराठा आरक्षण मराठा समाजास त्रास देणाऱ्यांचा वचपा या निवडणुकीत काढायचाच असा निर्धार देखील या बैठकीत झाला आहे.

Manoj Jarange Patil

अर्ज मागे घेण्याची उद्याची शेवटची तारीख?

4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सध्या मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. पक्षातील बंडखोरांना कसे शांत करायचे, यासाठी वरिष्ठ नेत्यांमध्ये खल चालू आहे. मतांचे विभाजन होऊ नये यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांकडून नाराज नेत्यांची मनधरणी करणे चालू आहे. असे असतानाच आता मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत उडी घेतली असून काही मतदारसंघांत निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी मतदारसंघांची नावं देखील दिली आहेत.

दसरा मेळाव्यात काय केली भूमिका स्पष्ट?

मनोज जरांगे यांनी दसरा मेळावा घेऊन त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केली होती. राज्यातील काही निवडक मतदारसंघांत उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मनोज जरांगे यांनी जिथे आपली ताकद आहे तसेच अन्य पक्षांचे, गटांचे समर्थन मिळणे ज्या भागात शक्य आहे तेथे निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. एससी, एसटी या आरक्षित जागांवर ते उमेदवार उभे करणार नाहीत. सोबतच ज्या जागांवर आपली ताकद नाही, त्या ठिकाणी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडायचं, असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यानंतर आता जरांगे यांनी आज निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघांची घोषणा केली आहे.

जरांगे कोणकोणत्या जागांवर उमेदवार देणार !

1) केज - राखीव - बीड जिल्हा

2) परतूर - जालना जिल्हा

3) फुलंब्री - छत्रपती संभाजीनगर जिल्हा

4) बीड - बीड जिल्हा

5) हिंगोली- हिंगोली जिल्हा

6) पाथरी- परभणी जिल्हा

7) हदगाव - जिल्हा नांदेड

कोणकोणत्या मतदारसंघांत पाडण्याची मोहीम राबवणार?

1) भोकरदन - जालना जिल्हा

2) गंगापूर - छत्रपती संभाजीनगर

3) कळमनुरी - हिंगोली जिल्हा

4) गंगाखेड - परभणी जिल्हा

5) जिंतूर - परभणी जिल्हा

6) औसा - लातूर जिल्हा

कोणत्या मतदारसंघात पाठिंबा देणार?

1) बदनापूर - राखीव जालन जिल्हा

2) पश्चिम विधानसभा - जिल्हा छत्रपती संभाजीनगर


अभिमन्यू पवार, संतोष दानवेंचा मुलगा हिटलिस्टवर!

दरम्यान, कळमनुरीमध्ये शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर, औसामधून भाजप आमदार अभिमन्यू पवार, भोकरदनमधून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे आदी दिग्गज चेहरे मनोज जरांगे पाटील यांच्या हिटलिस्टवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे बदनापूरमधून पाठिंबा देण्याची घोषणा सुद्धा पाटील यांनी बैठकीत केली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी काही संभाव्य मतदारसंघाची बैठकीत नाव घेतली. संभाजीनगरमधील फुलंब्री मतदारसंघातून उमेदवार देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तर, बीड जिल्ह्यातील 2 मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील उमेदवार देणार आहेत. त्यामध्ये बीड तालुका आणि केज (राखीव, मतदारसंघ) मधून जरांगे पाटील यांचे उमेदवार देण्यात येतील, असे दिसते. दरम्यान, राखीव मतदारसंघाबाबत 10 तारखेनंतर निर्णय घेऊ, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+