Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आधी मुलींना शिक्षण मोफत द्या, मग भाऊ मेहुणा-मेव्हुणीसाठी योजना काढा - मनोज जरांगेचा सरकारवर हल्लाबोल

जालना - मनोज जरांगे यांनी लाडकी बहिण योजनेवरुन राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. आज लाडकी बहिण योजना काढली पण या योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला अडचण येत आहे. मी योजनेवर टीका करीत नाही पण दुसऱ्यांचे मुंडके मोडू नका, आधी मुलींना शिक्षण मोफत द्या मगच भाऊ, मेव्हुणी-मेव्हुण्यांसाठी योजनाही काढा, अशी टीका मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे यांनी केला.

..मगच भाऊ, मेव्हूण्यासाठी योजना आणा

मनोज जरांगे म्हणाले, पंधराशे रुपये घेऊन आमच्या लेकरांचे भविष्य मार्गी लागणार नाही. मी म्हणतो मुलींना शिक्षण मोफत करा. नोकर भरती करा, मगच भावाला, बहिणीला योजनेतून पैसे द्या, मेव्हणी, मेव्हुण्यांसाठीही योजना काढा. तिकडे पैसे देण्याऐवजी मुलींच्या शिक्षणात पैसे टाकायला हवे अशा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.

manoj jarange on cm eknath shinde

लढायचे की पाडायचे 29 ऑगस्टला ठरवू

मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे यांनी शनिवारी पुन्हा एकदा आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत मराठा समाजाला विधानसभेच्या सर्वच 288 जागांचा डेटा तयार करण्याचे आवाहन केले. तुम्ही 288 जागांचा डेटा तयार करा, त्यानंतर लढायचे की पाडायचे हे आपण 29 ऑगस्टला ठरवू, असे ते म्हणाले.

मराठा समाजासाठी तुम्हाला मतदान करायचे आहे. खूप जणांनी इच्छूक न राहता आपल्या माणसांसाठी काम करा, टफ फाईट होऊ द्या. आपण निवडणूक लढवायचे म्हणालो तर महायुती खूश होत आहे, त्यांना वाटते आपले उमेदवार निघून जाईल. तर मविआवाले म्हणतात मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत बोलू नका. ओबीसीबद्दल बोलू नका, महायुतीने आरक्षण दिले नाही तर आपल्याला मराठा समाज साथ देईल अशी मविआची भूमिका असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

सरकार डाव टाकत आहे

मनोज जरांगे म्हणाले, गॅझेट आणतो म्हणतात अजून किती दिवस हवे. अकरा महिने झाले. का मराठ्यावर अन्याय करत आहात. हेळसांड का करीत आहात. राजपूत, मुस्लीम, धनगर आरक्षणासाठीही सरकार विलंब करीत आहे. हे डाव सरकारचे असून ते आमच्या लक्षात आले.

आमच्यावर अन्याय

मनोज जरांगे म्हणाले की, पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी पोलिसांनी मराठा विद्यार्थ्यांवर खुल्या प्रवर्गातून सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली आहे. जे लोक बोगस कागदपत्रे सादर करतात त्यांना तुम्ही आयएएस करत आहात आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकडे खरी कागदपत्रे असताना अन्यात सुरू आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+