मलिक-मुश्रीफ मोदींना चालतात, मग आम्ही मुस्लिमांसोबत का चालत नाही..? जरांगेंचं चोख प्रतिउत्तर
Maharashtra Assembly Election 2024 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उद्या त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी काल त्यांनी दलित व मुस्लिम समाजाला एकत्र करत विधानसभेचे रणशिंग फुंकले.
जरांगे हे मुस्लिम धार्जिणे आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी मोदींचा दाखला देत आरोपांना सडेतोड उत्तर दिले.

जरांगे यांचे टिकाकारांना चोख प्रतिउत्तर
मनोज जरांगे म्हणाले, मला मुस्लिम धार्जिणे म्हणणारे स्वत: मुस्लिम धार्जिणे नाहीत का..? ट्रोल करणारे आणि त्यांचे बाप ते मु्स्लिम धार्जिणे नाहीत का..? मोदी साहेब नवाब शरीफच्या मुलीच्या लग्नाला पाकिस्तानला गेले होते. बांगल्यादेशच्या पंतप्रधान पळून भारतात आल्या. त्यांना मोदी साहेबांनी सांभाळलं. ती काय त्यांची आत्या होती का? ते मुस्लिम धार्जिणे नाहीत का? पाशा पटेल कोण आहे? ते मुसलमान यांना चालतात.
आम्ही मुस्लिमांना भेटलो की मला जातीवाद म्हणतात. नवाब मलिक, हसन मुश्रीफ कोण आहेत..? तुम्ही दर्ग्यात जाता. त्यावेळी तुम्हाला चालतं. आम्ही गेलो की, चालत नाही. तुम्हालाच हिंदूत्व कळतं का? आम्ही कट्टर हिंदू आहोत. आम्ही छत्रपतींचं हिंदूत्व मानतो, असं म्हणत जरांगे यांनी टिकाकारांना चोख प्रतिउत्तर दिलं.
तुम्हालाच हिंदूत्व कळतं का? आम्ही कट्टर हिंदू आहोत
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, भाजपला मराठ्यांना मोठं केलं आहे. आम्ही हिंदू आहेत. तुम्हाला आम्ही फक्त मुस्लिमांबरोबर भांडण खेळायला लागतो. मराठ्यांना आरक्षण देताना हिंदू का विरोध करतो..? छगन भुजबळ हिंदू नाही का? बाकीचे मराठा आरक्षणाला विरोध करणारे हिंदू नाहीत का? हिंदूमधील मराठ्यांची जात धोक्यात आहे.
आता सर्व हिंदूंनी म्हणावे की, मराठ्यांना आरक्षण द्या. भांडण करायच्या वेळेस आम्ही लागतो. आम्ही मुस्लिमांना शत्रू मानत बसतो. ते आम्हाला पाणी वाटतात. आमचेच हिंदू आमच्या विरोधात मोर्चे काढतात. आरक्षण देऊ नका म्हणतात, हे कोणतं हिंदूत्व आहे? असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.












Click it and Unblock the Notifications