Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटेंचा सदनिका घोटाळा काय आहे? जाणून घ्या आरोप दावे, बाजू

Manikrao Kokate SRA Flat Scam : महायुती सरकारमधील क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळ्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा नाशिक सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यामुळे त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी दोन्ही धोक्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दीर्घकाळापासून पाठपुरावा केलेल्या SRA आणि म्हाडा सदनिका घोटाळा प्रकरणात अखेर मोठी कारवाई झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आणि राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना या प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या कोकाटे यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले असून, यामुळे महायुती सरकारची डोकेदुखी वाढली आहे. तर दुसरीकडे त्यांच्याकडील सर्व खाती काढण्यात आली असून मंत्रीपदालाही धक्का बसला आहे.

Manikrao Kokate

काय आहे 'सदनिका घोटाळा' प्रकरण?

मीडिया रिपोर्टनुसार, अंजली दमानिया यांनी पुराव्यासह केलेल्या दाव्यानुसार, माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी (विशेषतः कन्या प्रज्ञा कोकाटे) सत्तेचा गैरवापर करून मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सदनिका लाटल्या आहेत असा आरोप करण्यात आला होता.

पात्रतेचे उल्लंघन, काय आहे आरोप

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) अंतर्गत मिळणारी घरे ही केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि झोपडपट्टीधारकांसाठी असतात. मात्र, कोकाटे यांनी प्रभावाचा वापर करून ही घरे स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावे केल्याचा आरोप आहे.

मैत्री सोसायटी आणि कुर्ला-वांद्रे कनेक्शन

वांद्रे आणि कुर्ला येथील 'मैत्री' सहकारी गृहनिर्माण संस्थेसह विविध प्रकल्पांमध्ये एकाच कुटुंबाने अनेक सदनिका बळकावल्याचे दमानिया यांनी उघड केले आहे.

बेनामी व्यवहार आणि कागदपत्रांची फेरफार

या घोटाळ्याचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. दमानिया यांच्या आरोपानुसार, गरिबांच्या नावे खोटी कागदपत्रे तयार करून किंवा 'बेनामी' व्यवहार करून ही घरे नंतर कोकाटे यांच्या ताब्यात आली. "ज्यांच्या नावे घरे होती, ते लोक तिथे कधीच राहत नव्हते, हे केवळ कागदोपत्री व्यवहार होते," असा दावा त्यांनी केला आहे.

'लुटीचे वाटे' आणि राजकीय प्रतिक्रिया

दमानिया यांनी या प्रकरणाला 'लुटीचे वाटे' असे संबोधले असून, "राजकीय तडजोडींमुळे गुन्हेगारांना अभय दिले जात आहे," असा घणाघात केला आहे. दुसरीकडे, माणिकराव कोकाटे यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून, "हे केवळ राजकीय सूडबुद्धीने केलेले कारस्थान आहे, आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत," अशी भूमिका घेतली आहे.

आमदारकी, मंत्रिपदाला धक्का

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, जर एखाद्या आमदाराला २ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली, तर त्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता बळावली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+