Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पत्ते खेळणं भोवलं! कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदलणार? भरणे नवे कृषी होणार?

विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान मोबाईलवर पत्ते खेळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, महायुती सरकारने कोकाटे यांचा थेट राजीनामा घेण्याऐवजी त्यांच्याकडील खातं बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

manikrao kokate portfolio change


खांदेपालटाची शक्यता: कृषी खाते कोणाला मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी मंत्रिपद काढून दुसऱ्या मंत्र्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे. या बदल्यात कोकाटे यांना त्या मंत्र्याकडील दुसरे खाते दिले जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत कोकाटे यांचे खाते बदलण्याचा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, अधिवेशनात मोबाईलवर पत्ते खेळणं कोकाटेंना चांगलंच भोवल्याचं स्पष्ट झालं आहे.

आज संध्याकाळपर्यंत निर्णय अपेक्षित

माहितीनुसार, खातेबदलाबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी आज (गुरुवार, 31 जुलै) संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना (Notification) आजच काढली जाऊ शकते.

कृषी खाते मकरंद पाटील किंवा दत्तात्रय भरणे या दोघांपैकी एकाकडे दिले जाण्याची चर्चा आहे. सध्या दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खाते आहे, तर मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन हे खाते आहे. या दोघांपैकी ज्या मंत्र्याकडे कृषी खाते जाईल, त्यांच्याकडील खाते माणिकराव कोकाटे यांना दिले जाऊ शकते. म्हणजेच, कोकाटे यांना मदत व पुनर्वसन किंवा क्रीडा व युवक कल्याण यापैकी एक खातं मिळण्याची शक्यता आहे.

विरोधकांकडून टीका, सरकारने स्वीकारला 'मध्यम मार्ग'

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोकाटे यांच्या या कृतीवर आणि 'सरकारला भिकारी' म्हणण्यासंबंधीच्या त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.

या प्रकरणात महायुती सरकारने कोकाटे यांचा थेट राजीनामा घेण्याऐवजी, त्यांच्याकडील महत्त्वाचे कृषि खाते बदलून त्यांना दुसरे खाते देण्याचा 'मध्यम मार्ग' स्वीकारल्याचे दिसत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+