Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

CD तुटली, CDR सर्टीफाईड नाही! मालेगाव स्फोटातील 7 आरोपी कसे निर्दोष सुटले? 2 आरोपीचे काय? जाणून घ्या

Malegaon Bomb Blast Result How did 7 accused get away : मालेगाव येथे २००८ ला झालेल्या बाॅम्बस्फोटातील आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मु्क्तता केली आहे. आज गुरुवारी ३१ जुलै रोजी न्यायालयाने हा निर्णय दिला. यामध्ये भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

मालेगाव बाॅम्बस्फोटातील दोन आरोपी गायब असून त्यांच्याविरोधात नव्याने चार्जशीट दाखल करावी लागेल असे न्यायालयाने म्हटले आहे. विशेष न्यायालयाने सात जणांची निर्दोष केल्यानंतर आता या केसमधील पीडित सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

Malegaon Bomb Blast Result

कोर्टाने काय म्हटले?

न्यायालयाचे विशेष न्याय‍धीश लाहोटी यांनी या प्रकरणाचा निकाल देताना आरोपींवरील काही आरोप फेटाळले आहेत, तर काही स्वीकारले आहेत. सात आरोपींवर दोषी ठरतील असे पुरावे असे नाहीत. कर्नल पुरोहीत यांच्यामार्फत आरडीएक्स आणल्यासंदर्भात काही पुरावे नाहीत, पुरोहीत यांनी बाॅम्ब तयार केला याचा काही पुरावा मिळालेला नाही.

स्फोट झाला तिथे दुचाकी कुणी लावली? पुरावा नाही

आजतकच्या वृत्तानुसार, न्यायालयाने निर्णय देताना म्हटले की, ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे बाईक कोणी लावली होती याचे काहीही संदर्भ किंवा पुरावे नाहीत, दगडफेक कोणी केली याचेही पुरावे नाहीत तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान कोणी केले व या घटनेनंतर पोलिसांची बंदूक कुणी हिसकावली या संदर्भाततील प्रश्नांचे काहीही पुरावे मिळून आले नाहीत.

तपासात त्रुटी- निरीक्षण

विशेष न्यायालयाने म्हटलं आहे की, घटनास्थळी पंचनामा योग्य पद्धतीने केला गेला नाही. घटनास्थळी बारकोडींगही झालं नव्हतं. याशिवाय फॉरेन्सिक अहवालही योग्य नव्हता, यावरून कोणतेही निष्कर्ष काढता येत नाही, याशिवाय जी बाईक घटनास्थळी आढळली, तिची मालकी प्रज्ञासिंह यांची आहे याचा कोणताही पुरावा नाही.

अभिनव भारत या संघटनेच्या निधीच्या वापरा संदर्भात बोलताना कोर्ट म्हणाले की, 'अभिनव भारत' च्या निधीचा वापर दहशतवादी झाला याचा काहीही पुरावा मिळालेला नाही.

प्रज्ञा ठाकूर यांच्या बैठकीच्या सीडीज तुटलेल्या आढळल्या

खटल्यादरम्यान ३९ साक्षीदारांनी साक्षीसाठी नकार दिला, तर काही सीडीज तुटलेल्या आढळल्या, ज्याचे मोठे नुकसान झाले. या सीडीजमध्ये ठाकूर, पुरोहित आणि इतरांच्या काही कट रचण्याच्या बैठकांचे व्हिडिओ फुटेज होते आणि ते स्वयंघोषित धर्मगुरू आणि आरोपी सुधाकरधर द्विवेदी यांनी गुप्तपणे रेकॉर्ड केले होते. पण या सीडीज न्यायालयात सादर करण्यापूर्वीच त्या तुटलेल्या आढळल्या आणि त्यांच्या प्रती मिळविण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही.

न्यायालयात सीडीआर रेकॉर्ड फेटाळला

सरकारी पक्षाने पाहिलेल्या आरोपींच्या सीडीआरबाबत वकील बाबर म्हणाले, की त्यांच्याकडे कलम ६५ ब प्रमाणपत्र नव्हते, म्हणून न्यायालयाने सीडीआर विचारात घेतले नाहीत. पुरावा कायद्यानुसार, हे प्रमाणपत्र इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड प्रमाणित करण्यासाठी आवश्यक असलेले दस्तऐवज आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+