Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

देवेंद्र फडणवीसांची मॅजिक! महायुतीचा महाविकास आघाडीला दणका!

मुंबई - विधान परिषदेत निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत महायुती विजयी झाली आहे. महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीचे महाराष्ट्रातील चाणक्याची अर्थात देवेंद्र फडणवीसांची जादू पुन्हा चालली. यानिवडणुकीत देवेंद्र फडणवीसांसोबतच त्यांच्या खास व्यक्तींनी शर्थ लावत विजयश्री खेचून आणली.

महायुतीत भाजपच मोठा भाऊ

महायुतीत कोण मोठा आणि कोण छोटा असा वाद लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण होत असतानाच आता विधानपरिषद निवडणुकीत भाजपने विजयश्री संपादन केला. यामुळे आपणच मोठा भाऊ असल्याचे त्यांच्या आजच्या मोठ्या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत भाजपच्या सर्वच्या सर्व पाच उमेदवार निवडून आले आहेत.

Legislative Council Elections

लोकसभा निवडणुकीतील उट्टे काढले

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांची पिछेहाट सुरु झाल्याचे बोलले जात होते. विशेषतः जेव्हा ते मुख्यमंत्र्‍याऐवजी उपमुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांचे पक्षातील वजन कमी होत असल्याचेही बोलले जात होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला.

2019 मध्ये लोकसभेला भाजपने 21 जागी विजय मिळवला होता पण 2024 च्या निवडणुकीत भाजपला अवघ्या 9 जागाच मिळवता आल्या. त्यामुळे या निवडणुकीचे महाराष्ट्रात नैतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे कमालीचे नाराज झाले होते. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचाही त्याग करण्याचा मानस व्यक्त केला होता. पण या निवडणुकीत विजय प्राप्त करुन त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीचे काहीअंशी उट्टे काढले आहे.

महायुती पुन्हा फ्रंटवर..

महायुतीचा आजचा विजय विधानसभा निवडणुकीसाठी रंगित तालीम आहे. या विजयाने महायुतीचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महायुती राज्यात बॅकफूटवर गेली होती. मात्र, त्यानंतर आज 11 पैकी 9 जागा मिळवत महायुतीने महाविकास आघाडीला या निवडणुकीत पाणी पाजत पुन्हा महाराष्ट्रात आपण फ्रंटवर आहोत हाच संदेश दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांची जादू

विधानपरिषद निवडणुकीत एकूण 11 जागा होत्या. ही निवडणुक बिनविरोध होईल असे वाटत होते पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मिलिंद नार्वेकर यांच्या रुपात बारावा उमेदवार घोषित करत मैदानात उतरवला. त्यामुळे या निवडणुकीत चूरस वाढली.

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व तीन उमेदवार विजयी होतील असा कयास बांधण्यात आला होता. विशेषतः घोडेबाजार होऊ शकतो ही शक्यताही होती. पण महायुतीने आपल्या आमदार फुटण्यापासून वाचवले. यात देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची भूमिका निभावली. महायुतीचा एकही आमदार त्यांनी फुटु दिला नाही अन्यथा चित्र वेगळे असते.

महायुतीला 100 टक्के यश

महायुतीतील अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि भाजप हे बॅकफूटवर गेले होते, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यावर टीकाही झाली, पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन नेते शांतपणे त्यांचे काम करीत होते. याची पावती म्हणूनच त्यांना या निवडणुकीत शंभर टक्के यश प्राप्त झाले आहे.या निवडणुकीमुळे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही विश्वास उंचावला आहे.

महायुतीतून हे उमेदवार विजयी

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजी गर्जे, राजेश विटेकर हे विजयी झाले. भाजपच्या पंकजा मुंडे, अमित गोरखे, योगेश टिळेकर, परिणय फुके, सदाभाऊ खोत हे पाच उमेदवार तर शिंदे गटाच्या भावना गवळी, कृपाल तुमाणे हे दोन उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा एकमात्र विजय झाला आहे.

मविआतून हे उमेदवार विजयी

महाविकास आघाडीतून प्रज्ञा सातव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर निवडून आले आहेत. महाविकास आघाडीने या निवडणुकीत आधी 2 उमेदवार उभे केले पण उद्धव ठाकरे यांनी डाव टाकत त्यांच्या पक्षाकडून मिलिंद नार्वेकरांना उभे केले अन् त्यांनी विजयही मिळवला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+