Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

BIG News : महायुतीमध्ये 277 जागा ठरल्या! PM मोदींच्या राज्यात 13 सभा कधी, कुठे होणार? घ्या जाणून

महायुतीमध्ये 277 जागा एकमताने ठरल्या असून उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होऊन जागावाटपाच्या चर्चा बंद होतील, असे भारतीय जनता पक्षाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितले. भाजपाची दुसरी व तिसरी यादी केंद्रीय संसदीय बोर्ड जाहीर करणार आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रातील रणसंग्राम जिंकण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार असून त्यांच्या जवळपास तेरा सभा राज्यात हेेणार आहे. या सभांचे नियोजन भाजपकडून सुरु आहे. मात्र काही शहरांची नावे घोषित करण्यात आली असून उर्वरित ठिकाणी मात्र अजून नियोजन होत आहे.

Mahayuti Seat allocation Complete PM Modis 13 meetings in Maharashtra

भाजपच्या इच्छुकांनी उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय केंद्रीय पालिर्यामेंट्री बोर्डाच्या विरुद्ध जाऊन नामांकन अर्ज दाखल करू नये असे भाजप कार्यकर्त्यांना बजावले आहे.

पाीएम मोदींच्या 13 ठिकाणी सभा

महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात 11 ते 13 ठिकाणी सभा होणार आहेत.

  • मुंबई
  • गोंदिया अकोला
  • नांदेड
  • धुळे
  • नवी मुंबई

(यासह अन्य शहरे ठरत आहेत.)

चंद्रशेखर बावनकुळेंचे या मुद्द्यांवर वक्तव्य

  • चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नागपुरात कोणतीही जागा मागितली नाही.
  • चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपाच्या संपर्कात आहेत.
  • जिल्हाचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे त्यांच्याशी समन्वय साधून योग्य निर्णय होईल व चर्चेतून निर्णय होईल.
  • नागपूर शहरात प्रत्येक जागेसाठी 5 ते 8 नावे पार्टीकडे आली आहेत. निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करेल.
  • नवाब मलिक यांच्याबाबत निर्णय अजित पवार घेतील. त्यांना सांगण्यात आले आहे. आमची चर्चा झाली.
  • आमदार रवी राणा हे त्यांच्याच युवा स्वाभिमान पक्षात राहतील.

यांचा भाजपमध्ये प्रवेश

आर्णी विधानसभा मतदासंघातील माजी आमदार राजू तोडसाम, मूर्तीजापूर विधानसभा क्षेत्रातील नेते रवी राठी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. त्यांचे पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. अमरावती जिल्हा उपाध्यक्ष तसेच मोर्शी विधानसभेचे भाजपा नेते उमेश यावलकर यांनी दिलेला राजीनामा परत घेतल्याची माहिती श्री बावनकुळे यांनी दिली. पक्षप्रवेशाने भाजपा संघटन मजबूत होणार असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतील असा विश्वास व्यक्त केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+