Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mahayuti oath ceremony : अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ! 'अर्थ' खातं मिळण्याची शक्यता

Mahayuti oath ceremony : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. आज पुन्हा अजित पवार महाराष्ट्राचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले असून यावेळीही त्यांचे मुख्यमंत्रीपद मात्र हुकले आहे.

अजित पवार महाराष्ट्रातील राजकारणातील महत्वाचे नाव असून ते उपमुख्यमंत्री बनताच पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांचे हितचिंतक आणि परिवार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.

Mahayuti oath ceremony

लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारल्यानंतर अजित पवार डगमगले नाही. त्यांनी आपला संघर्ष सुरुच ठेवत 41 आमदार या विधानसभा निवडणुकीत निवडून आणले. संपूर्ण भारताचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे तरुण उमेदवार आणि स्वतःचे पुतणे युगेंद्र पवार यांचा पराभव करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेतील पराभवाचा पैरा फेडला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघावर शरद पवार यांचे वर्चस्व असले तरी विधानसभा मतदारसंघावर "दादागिरीच" कायम आहे हेच अजित पवार यांनी त्यांच्या विजयाने नुकतेच दाखवून दिले आहे.

बारामतीची निवडणूक झाली प्रतिष्ठेची

बारामती विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक अजित पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. बारामतीत अजित पवार यांना चारीमुंड्या चीत करून राष्ट्रवादीतील बंडखोर गटाचे आव्हानच पुरते मोडून काढायचे असा चंग शरद पवारांनी बांधला होता. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून आणि त्यानंतर अजित पवार यांच्याकडे गेलेले गावोगावचे कार्यकर्ते परत आपल्याकडे वळवून शरद पवार यांनी अजित दादांना चांगलेच घेरले होते.

अजित दादांनी तुतारीला दिला शह

विशेषतः पुणे जिल्ह्यात आणि शहरात अजित पवार गटाची मोठी पडझड झाली होती. अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात दौरे करून आणि त्या मतदारसंघात विरोधातील तगडे उमेदवार स्वतःकडे वळवून तुतारी वाजवण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला होता. पक्षावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अजित पवार यांच्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा होता.

निवडणुकीत झाली घरातूनच दादांवर मोठी टीका

अजित पवार यांच्या विरोधात षड्डू ठोकण्यासाठी शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांची निवड केली होती. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. युगेंद्र पवार यांना संपूर्ण बारामती विधानसभा मतदारसंघ फिरवण्यात शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. गावागावातील छोट्या छोट्या गटांशी शरद पवार यांनी युगेंद्र यांची ओळख करून दिली होती. चुलते अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना बारामतीत भ्रष्टाचार बोकाळल्याची टीका युगेंद्र यांनी केली.

अजित पवारांच्या राजकारणाला नवीन उभारी

शरद पवार यांच्या कुटुंबातच सध्या फूट पडली असून शरद पवार यांना मानणारे कुटुंबीय युगेंद्र पवार यांच्या बाजूने बारामतीच्या मैदानात उतरलेले दिसले. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार कधीही सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहत नाहीत. मात्र युगेंद्र पवार यांच्या विजयासाठी त्या कंबर कसून बारामतीच्या मैदानात उतरल्याचे दिसून आले. त्यामुळेच अजित पवार यांच्यासाठी ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची होती.

या निवडणुकीत पराभव पदरी पडला असता तर अजित पवार यांच्या राजकीय भविष्यासमोरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असते. तसेच त्यांना मानणाऱ्या आमदारांनी पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला असता. आणि राष्ट्रवादीचे अस्तित्वच समाप्त झाले असते. बारामती विधानसभा मतदारसंघातील या विजयाने अजित पवार यांच्या राजकारणाला नवी उभारी दिली आहे. त्यामुळे भविष्यात अन्य कोणत्याही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता धूसर झाली आहे .

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+