या 4 जागी MVA मध्येच लढत! BJP, Ncp, शिवसेना, काँग्रेस, उद्धव ठाकरे, शरद पवारांचे एवढ्या जागी उमेदवार
Mahayuti MVA Final Seats Sharing Seats : महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांवर बंडखोर उमेदवारांचे एकीकडे संकट असतानाच दोन्ही आघाड्यांअंतर्गतही उमेदवार उभे आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीचा निकाल अपक्षच लावतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीत अशा चार जागा आहेत, जिथे उद्धव ठाकरे विरुद्ध शरद पवार, शरद पवार विरुद्ध काँग्रेस, आणि काँग्रेस विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या उमेदवारांचा सामना होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये परंडा, पंढरपूर , दिग्रस आणि धारावी या विधानसभा जागा आहेत जिथे महाविकास आघाडी (MVA) तील घटकपक्ष काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (UBT) चे उमेदवार आमनेसामने आहेत आणि एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
मविआने उभे केले 286 जागांवर उमेदवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी नामांकन प्रक्रिया संपली आहे. महाविकास आघाडी पक्षांनी 286 जागांवर उमेदवार उभे केले असून महायुती पक्षांनी 284 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. अनेक जागांवर महाविकास आघाडीच्या घटक दल पक्षाच्या उमेदवारांमध्ये संघर्ष आहे.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये संघर्ष
परंडा विधानसभा मतदारसंघ : परंडा विधानसभा मतदारसंघातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (राष्ट्रवादी) ठाकरेंच्या शिवसेनेकडून राहुल मोटे आणि उद्धव ठाकरे यांनी रणजित पाटील यांना तिकीट दिले आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघ : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल सावंत आणि काँग्रेसने भगीरथ भालके यांना तिकीट दिले आहे.
दिग्रस विधानसभा मतदारसंघ : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेनं पवन जैस्वाल यांना उमेदवारी दिली आहे.
धारावी विधानसभा मतदारसंघ : काँग्रेसकडून ज्योती गायकवाड रिंगणात आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बाबुराव माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महाराष्ट्रात किती जागांवर कोण निवडणूक लढवत आहे?
महाविकास आघाडीतील पक्ष किती जागांवर लढतोय
- महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 103
- उद्धव ठाकरेंची शिवसेना 96
- शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 87 जागांवर निवडणूक लढवत आहेत
महायुतीतील पक्ष किती जागांवर लढतोय
- महायुतीच्या घटक पक्षांमध्ये भाजप 148
- एकनाथ शिंदेंची शिवसेना 80
- अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 52 जागांवर निवडणूक लढवत आहेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 7, 995 उमेदवार रिंगणात
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 29 ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी अखेरपर्यंत एकूण 7 हजार 995 उमेदवारांनी 10 हजार 905 नामांकन अर्ज दाखल केले. सध्या बंडखोरी केली जात आहे. नाव मागे घेण्यासाठी मनधरणी केली जात आहे. 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सर्व 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.












Click it and Unblock the Notifications