'हे' आहेत महायुती सरकारचे संभाव्य मंत्री! उद्यापासून 3 दिवस विशेष अधिवेशन, कोळंबकर हंगामी अध्यक्ष
Mahayuti govt possible ministers List : महायुती सरकारचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन उद्यापासून होणार आहे. त्याधर्तीवर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे. यासह महायुती सरकारचा मंत्रीपदाचाही फाॅर्म्युला ठरला असून 21-12-10 असा आहे. आता महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आली आहे. यामध्ये नितीश राणे, धनंजय मुंडे ते आशिष शेलार यांचा समावेश असू शकतो.
उद्यापासून 3 दिवस विशेष अधिवेशन
विधीमंडळाच्या हंगामी अध्यक्षपदी सर्वात ज्येष्ठ आणि आणि सर्वाधिकवेळा निवडून आलेल्या आणि मान दिला जातो. यामध्ये कालीदास कोळंबकर हे सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे नाव हंगामी अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. आज दुपारी कोळंबकर हे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतील आणि तीन दिवसीय विशेष अधिवेशनातील कामकाजासाठी अध्यक्ष असतील.

मंत्रीपदाचा फार्म्युला ठरला
महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी आझाद मैदानावर संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस
यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. महायुतीच्या या शपथविधीनंतर हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात एकूण 288 आमदार असून मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची मर्यादा 43 इतकी आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची संख्या असू शकत नाही. याचदरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे. यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
1. देवेंद्र फडणवीस
2. गिरीश महाजन
3. रविंद्र चव्हाण
4. मंगलप्रभात लोढा
5. चंद्रशेखर बावनकुळे
6. आशिष शेलार
7. नितेश राणे
8. शिवेंद्रसिंहराजे भोसले
9. राहुल कुल
10. माधुरी मिसाळ
11. संजय कुटे
12. राधाकृष्ण विखे पाटील
13. गणेश नाईक
14. पंकजा मुंडे
15. गोपीचंद पडळकर
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी
1. एकनाथ शिंदे
2. उदय सामंत
3. शंभूराज देसाई
4. गुलाबराव पाटील
5. संजय शिरसाट
6. भरत गोगावले
7. प्रकाश सुर्वे
8. प्रताप सरनाईक
9. तानाजी सावंत
10. राजेश क्षीरसागर
11. आशिष जैस्वाल
12. निलेश राणे
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
1. धनंजय मुंडे
2. अदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. हसन मुश्रीफ
5. धर्मराव बाबा अत्राम
6. अजित पवार
7. छगन भुजबळ
(टीप : मंत्रिपदासाठी जास्त नावे जरी असली तरीही यातील काहींची संधी गमवण्याची शक्यता आहे)
कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आज हंगामी अध्यक्ष म्हणून राजभावनात जाऊन शपथ घेणार आहे. विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. आज या हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाईल. 7, 8 आणि 9 डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान हे हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील












Click it and Unblock the Notifications