महायुती 'या' 2 जागांवर लढणारच नाही! हे आलं खर कारण समोर, अजित पवारांचा पक्ष सर्वात कमी जागी लढणार
Mahayauti will contest on 286 seats : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. काल अर्जाची छणणीही झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालं आहे. महायुतीमध्ये भाजप 148, शिवसेना 80 तर राष्ट्रवादी 52 जागांवर लढत आहे. मित्र पक्षांसाठी सहा जागा म्हणजे महायुती एकूण 286 जागांवर निवडणूक लढवत आहे.
महायुती दोन जागांवर या निवडणुकीत लढणार नाही. याचे मुळ कारण आता समोर आले आहे. त्यात एक बाळा नांदगावकर यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही आणि दुसरा मालेगावमध्ये महायुतीला सक्षम उमेदवार सापडला नाही. हे मुळ कारण आहे.

दोन जागांवर महायुतीने दिले नाही उमेदवार
महायुतीने 286 ठिकाणी उमेदवार उतरवले आहेत, तर फक्त दोन जागांवरच महायुतीने उमेदवार दिलेले नाहीत. महायुतीने ज्या ठिकाणी उमेदवार दिलेले नाहीत, त्यामध्ये शिवडी आणि मालेगाव मध्य या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. शिवडीमध्ये उमेदवार न देऊन शिवसेना आणि भाजपने मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला.
मालेगावमध्ये उमेदवार दिला नाही
मालेगाव मध्य मतदारसंघांमध्ये जवळपास 99 टक्के मुस्लिम मतदार आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार देतात. या निवडणुकीत मालेगाव मध्य मधून समाजवादी पार्टीकडून शाने हिंद, एमआयएमकडून विद्यमान आमदार मुफ्ती इस्माईल, काँग्रेसकडून एजाज बेग आणि अपक्ष माजी आमदार आसिफ शेख असे चार उमेदवार आहेत.
अजित पवारांना मिळाली होती जागा
या मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिलेला नाही. महायुतीमध्ये ही जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला होती, मात्र त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नव्हता, म्हणून त्यांनी उमेदवार उतरवला नाही.
मानखुर्द शिवाजीनगरमध्ये राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिवसेनेने शिवाजी पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. दरम्यान भाजपने नवाब मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मोर्शीमध्ये भाजपकडून उमेश यावलकर तर राष्ट्रवादीकडून देवेंद्र भुयार यांना तिकीट देण्यात आलं आहे. आष्टीमध्ये भाजपने सुरेश धस यांना तर राष्ट्रवादीने बाळासाहेब आसबे यांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्रात किती जागांवर कोण निवडणूक लढवत आहे?
महाविकास आघाडीतील पक्ष किती जागांवर लढतोय
- महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 103
- उद्धव ठाकरेंची शिवसेना 96
- शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 87 जागांवर निवडणूक लढवत आहेत
महायुतीतील पक्ष किती जागांवर लढतोय
- महायुतीच्या घटक पक्षांमध्ये भाजप 148
- एकनाथ शिंदेंची शिवसेना 80
- अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 52 जागांवर निवडणूक लढवत आहेत.












Click it and Unblock the Notifications