'मविआ'चा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; 60 टक्के काम पूर्ण, तिढा असलेल्या जागांवर एजन्सी नेमणार?

Maha Vikas Aghadi Seat Sharing : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची घडामोड पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली आहे. जवळपास 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. काही गोष्टींवर उद्धव ठाकरे, शरद पवार अ्न् कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच जागावाटपावरून द्वंद सुरू असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. दुसरीकडे 40 टक्के जागांबाबत काही निर्णय होण्याची लवकरच शक्यता वर्तविली जात आहे.

जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल?

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 100 जागा काँग्रेस, 100 जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना तर 84 जागा शरद पवारांची राष्ट्रवादी लढेल, असे बोलले जात आहे. तर उर्वरित 4 जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या जाणार असल्याची माहिती आहे. 2019 साली जिंकलेल्या काही जागांवर महाविकास आघाडीचं ठरलंय. तीनही पक्षाच 60 टक्के जागांवर एकमत झालेले असल्याचे सांगितले गेले आहे.

Uddhav Thackeray

130 जागांवर मविआ पक्षातील नेत्यांचे सहमत

महाविकास आघाडीचे जवळपास 80 टक्के जागा वाटपावर चर्चा पूर्ण झाली आहे. विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागावाटपाची चर्चा करण्यात आली आहे. 120 ते 130 जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सहमती झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला जागा वाटपात दिला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. जिंकलेल्या जागांमध्ये दहा ते वीस टक्के बदल केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

विभागनिहाय प्रत्येक जागेवर चर्चा

पहिल्या बैठकीत मुंबई -कोकण आणि त्यानंतर मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र या विभागातील विधानसभा मतदारसंघातील जागांवर सविस्तर चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पार पडली. तिढा असलेल्या जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून एक एजन्सी नेमून कोणत्या पक्षाची जास्त ताकद आहे, हे जाणून घेतले जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय शेवटच्या टप्प्यात घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विदर्भातील विधानसभा जागांवर पुढील बैठकीत चर्चा होऊन त्या संदर्भात सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले गेले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+