Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Winter : राज्यात आता खरा हिवाळा सुरु होणार! गारवा वाढणार! 'या' तारखेपासून थंडी जाणवणार

कार्तिकी पौर्णिमा आणि दिवाळी सण पार पडल्यानंतर राज्यातील नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, ती गुलाबी थंडी अखेर दाखल होण्याची वेळ जवळ आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात थंडीच्या आगमनासाठी हवामान अनुकूल होत आहे. पुणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील किमान तापमान लवकरच कमी होण्यास सुरुवात होणार आहे.

राज्यात गेल्या आठ महिन्यांपासून पाऊस सुरु आहे. खास बाब म्हणजे उन्हाळ्यातही पावसाचा जाणवला, आता तर हिवाळा लागल्यानंतरही पावसाळ्याचाच फिल जाणवत होता. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर आता हळहळू तापमानात घट होताना दिसत आहे. पहाटे हे जास्त दिसून येत असून लवकरच थंडी जाणवेल असे हवामान तज्ज्ञ सांगतात.

Maharashtra Winter Likely from November 10

कडाक्याची थंडी कधीपासून वाढेल?

हवामान तज्ज्ञ आणि IMD च्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात थंडीचे वातावरण पुढील आठवड्यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. म्हणजेच येत्या१० नोव्हेंबरनंतर थंडीची तीव्रता हळूहळू वाढेल.

पाऊस कमी होणार

राज्यातील अनेक भागांमध्ये असलेला अवकाळी पावसाचा धोका आणि ढगाळ वातावरण १० नोव्हेंबर २०२५ नंतर पूर्णपणे कमी होण्याची शक्यता आहे. पाऊस थांबल्यानंतर आणि हवामान कोरडे झाल्यानंतर, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजेच १० नोव्हेंबरनंतर थंडीला सुरुवात होईल. सुरुवातीला ही थंडी मध्यम स्वरूपाची असेल.

थंडीची तीव्रता वाढणार

नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत (साधारणः १५ नोव्हेंबरनंतर) राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमान सामान्य पातळीवर किंवा त्याहून खाली येण्याची शक्यता आहे.

पुणे आणि मुंबईसाठी विशेष अपडेट्स

पुणे: सध्याचे किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असले तरी, १० नोव्हेंबरनंतर ते हळूहळू कमी होऊन शहरात सकाळ आणि रात्री चांगली थंडी जाणवण्यास सुरुवात होईल.

मुंबई: मुंबईच्या किमान तापमानातही घट होईल. दिवसा उष्णता जाणवली तरी, रात्री आणि पहाटे सुखद आणि थंड वातावरण निर्माण होईल.

थंडी सुरू झाल्यावर घ्यायची काळजी आणि उपाययोजना

उबदार कपडे: सकाळी आणि रात्री घराबाहेर पडताना गरम कपडे, स्वेटर किंवा शालीचा वापर करा.

आहार: शरीराला आतून ऊर्जा आणि उब मिळण्यासाठी पौष्टिक आणि गरम पदार्थांचे सेवन करा.

आरोग्य: सर्दी-खोकल्यासारखे आजार टाळण्यासाठी गरम पाणी प्या आणि रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यावर भर द्या.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+