Maharashtra Weather : हिवाळ्यात पावसाचे संकट, या जिल्ह्यांना रेड अलर्ट, IMDने काय दिला इशारा
Maharashtra Weather Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा सक्रीय पट्टा तयार झाला असून अरबी समुद्रात आर्दता वाढली आहे. त्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या वातावरणार देखील होताना दिसणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26-28 डिसेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान वाढलं आहे. कडाक्याची थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसात किमान तापमानात 2-4 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरत्या वर्षाच्या आठवड्यात पावसाची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर हिवाळ्यात राज्यावर दुहेरी संकटाचे सावट असल्याचे बोलले जात आहे.

तापमानाचा पार वाढणार
राज्यात तापमानाचा पारा येत्या दोन दिवसांनी हळुहळु वाढणार असून 2-4 अंशांनी किमान तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मध्य आणि पश्चिम भारतात येत्या 24 तासांत तापमानवाढीला सुरुवात होणार आहे. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला जोरदार पावसाची शक्यता असून पावसाची तीव्रता मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे. हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टही दिलाय.
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 26 डिसेंबर- धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर, 27 डिसेंबर रोजी नाशिक, पुणे, नगर,जळगाव,धुळे, नंदूरबार,छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी,बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.
दोन आठवड्यापासून कडाक्याची थंडी
मागील दोन आठवड्यात राज्यात कडाक्याची थंडी पडली होती. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात होत्या. पण आता ऐन हिवाळ्यात राज्याला पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट होऊ शकते, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.
#WATCH | Delhi: A thick layer of fog engulfs the national capital as cold wave grips the city.
— ANI (@ANI) December 24, 2024
Visuals from Kartavya Path. pic.twitter.com/46iVjqgc4U
दिल्लीत थंडी वाढणार
हवामान खात्याने दिल्लीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राजधानीच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुक्याचा दाट थर आणि थंडीची लाट यामुळे दिल्लीचे वातावरण थंड झाले आहे. धुक्यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. आज दिल्लीचे कमाल आणि किमान तापमान सुमारे २ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. सोमवारी झालेल्या हलक्या पावसामुळे राजधानीत रात्री थंडी वाढली असली तरी हवेच्या गुणवत्तेत कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही.
अवेळी पाऊस का येतोय?
बंगालच्या उपसागरात काही दिवसांपूर्वी धडकलेल्या फेंगल चक्रीवादळामुळं बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. यामुळे राज्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. समुद्राचं तापमान कमी जास्त झाल्यानं तसेच चक्राकार वारे आणि तयार होणारा कमी दाबाचा पट्टा इशान्येकडे सरकला आहे. दुसरीकडे उत्तरेकडील थंड प्रवाहाचा झोत राज्याच्या दिशेने असल्याने थंडी वाढली होती. पण कमी दाबाचा पट्टा धडकल्यानं अरबी समुद्रात आर्दता निर्माण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार झाली आहे.












Click it and Unblock the Notifications