Maharashtra Weather Update : सावधान..उन्हाचा सामना करायला तयार राहा! आजपासून राज्यातील तापमान वाढणार
Maharashtra Weather Update : मार्चअखेरीच काही ठिकाणी ढगाळ आणि दमट हवामान होते आता बदललेल्या वातावरणात पुन्हा बदल होत असून चार दिवस पावसाचा थंडावा देणारे वातावरण आता पुन्हा तापत आहे. आजपासून राज्यातील तापमान वाढणार आहे. अकोल्यात पारा ४१ तर ब्रम्हपुरीत ४१.३ अंशावर गेला आहे. त्यातच आता कोकणसह मराठवाडा विदर्भात तापमानात चांगलीच वाढ होत आहे. येलो अलर्टही हवामान विभागाने जारी केला आहे.
पारा चढतोय..
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाने ४० अंशांचा आकडा गाठला आहे. यामध्ये अकोला ४० तर ब्रम्हपुरीत तापमान ४१.३ अंश सेल्सियस इतक आहे. त्याखालोखाल सर्व विदर्भातील जिल्हे आणि मराठवाड्यातही तापमानात वाढ झाली आहे. तसेच आज राज्याच्या काही भागात उष्णता वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पारा आणखी चढणार आहे, आज संपूर्ण राज्यात कसे हवामान असेल ते सविस्तर जाणून घेऊयात.

एकीकडे तापमान वाढत असतानाच आता उकाड्यातही वाढ होत आहे. त्यामुळे उन्हात जाताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. खासकरुन हवामान विभागाने हा सल्ला दिला आहे. आज कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व घराबाहेर पडताना सुरक्षित उपाययोजना कराव्यात
ठळक घडामोडी (सकाळी ०८३० वाजता)
- एक वाऱ्याची द्रोणीय रेषा पूर्व बिहार ते पूर्व विदर्भापर्यंत जात आहे.
- उत्तर-दक्षिण वाऱ्याची द्रोणीय रेषा आता मराठवाड्यापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत जात आहे.
- गेल्या २४ तासांतील पर्जन्यमानः कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते.
- विदर्भात बऱ्याच ठिकाणी व कोकण गोव्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
- काल उर्वरित राज्यात कमाल तापमानात सरासरीच्या आसपास होते.
गेल्या २४ तासांत प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा) ३३.९, सांताक्रूझ ३५.९, अलिबाग रत्नागिरी ३५.४. पणजी (गोवा) ३४.९, डहाणू ३६.९, पुणे ३८.०, लोहगाव ३९.७. अहिल्यानगर ३७.९, जळगाव ४०.५, कोल्हापूर ३६.३, महाबळेश्वर ३०.८, मालेगाव ४०.६, नाशिक ३९.१, सांगली ३७.४, सातारा ३७.०, सोलापूर ३९.६, धाराशिव ३७.०, छत्रपती संभाजीनगर ३९.४, परभणी ३७.८, नांदेड, बीड ३९.५, अकोला ४१.०, अमरावती ४१.२. बुलढाणा ३७.२, ब्रह्मपुरी ४१.३, चंद्रपूर ४१.८, गोंदिया ३८.८, नागपूर ४०.२, वाशिम ३७.६, वर्धा ३६.२, यवतमाळ ३८.६.












Click it and Unblock the Notifications