Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra weather : भर उन्हाळ्यात महाराष्ट्रातील 'या' भागात पावसाचा इशारा, नागपुरात पारा चढला!

Nagpur weather Update News : होळी झाल्यानंतर राज्यात वातावरणात बदल होतो. तसा बदल आता जाणवायला लागला आहे. विविध जिल्ह्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. काही ठिकाणी तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या पार तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडताना दिसतोय.

आयएमडीने पुन्हा काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे. तर नागपूरातील तापमान आता दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आज नागपूरात तापमान सुमारे 40 अंश सेल्सिअसवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या जीवाची लाही लाही होऊ लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. होळीच्या अगोदरच हवामान खात्याकडून दोनदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. तर काल बुधवारपेक्षा आज वातावरणात उष्णता आणि उकाडा अधिक जाणवायला लागलेला आहे. तसा अंदाज देखील हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वीच दिलेला होता.

Maharashtra weather

महाराष्ट्रातील या भागात अवकावळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच लातूरला अवकाळी पावसाने झोडपले होते.

मुंबई शहरासह उपनगरांमधील स्थिती कशी?

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळच्या वेळी वातावरण अंशतः ढगाळ आणि दुपार, संध्याकाळपर्यंत मुख्यतः निरभ्र पाहायला मिळत आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 अंश सेल्सिअस आणि 22 अंश सेल्सिअसच्या आसपास दिसून येत आहे.

आजही अवकाळी सरी कोसळण्याचा अंदाज

आजही दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळीच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे अनेक शहरांमध्ये उन्हाच्या झळा या अधिक तीव्र होताना दिसत आहेत. दुपारच्यावेळी घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

कोणत्या जिल्ह्यात पाऊस अन् कुठे वाढला तापमानाचा पारा

कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात पावसाने हजेरी लावली. अकोल्याच्या तापमानाची नोंद काल 41.4 अंश सेल्सिअस नोंदवली गेली. जळगाव, चंद्रपूर, अमरावतीमध्ये पारा 40 वर पोहोचला होता. परभणी, वाशिम, वर्धा मालेगाव, यवतमाळ धुळे याठिकाणी 39 अंशावर तापमान गेल्याचं बघायला मिळालं. तर पुण्याच तापमानाचा पारा आज वाढलेला दिसून येत आहे. नागपूरमध्ये काल पारा 38 अंशावर पोहोचल्याचं बघायला मिळालं. तर आज देखील तापमान 40 अंशावर जाऊन पोहोचले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+