राज्यात 'या' तारखेपर्यंत पावसाचा जोर कायम! मराठवाड्यात पावसाला सुरुवात, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज
Maharashtra Weather Update : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांना दिलासा मिळाला आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात ८ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज आणि उद्या, म्हणजेच २ आणि ३ सप्टेंबर रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. आगामी काही दिवस राज्यासाठी पावसाचेच असतील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

विभागनिहाय हवामानाचा अंदाज
कोकणात कसे राहील हवामान?
- कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे.
- किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
- ४ ते ८ सप्टेंबरदरम्यान कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरू राहील. काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
- नाशिक, धुळे आणि इतर जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- या दरम्यान, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
- मध्य महाराष्ट्रात ८ सप्टेंबरपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात आज कसा आहे पाऊस?
- आज मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस अपेक्षित असून, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
- यासोबतच, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो.
- ४ ते ८ सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात काही ठिकाणी आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भात आज पावसाची स्थिती काय आहे?
- आज विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल.
- तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
- ४ ते ८ सप्टेंबरदरम्यान येथे बहुतेक ठिकाणी पाऊस सुरू राहील. विशेषतः ७ आणि ८ तारखेला पावसाचा जोर वाढू शकतो.
पुणे आणि आसपासचा परिसरात असा पडेल पाऊस?
- पुणे शहरात आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.
- घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- पुण्यात ही स्थिती ८ सप्टेंबरपर्यंत कायम राहील.












Click it and Unblock the Notifications