Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra weather: महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल सूखद; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना मिळाला अलर्ट

Maharashtra Weather Update News : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

मराठवाडा, विदर्भात आज कशी असेल स्थिती?

तर, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर, मुंबई आणि उपनगरातही पहाटेपासूनच पावसाने जोर धरलेला आहे.

Maharashtra Weather Update

मुंबई, पुणे या भागात पावासाची स्थिती काय?

आयएमडी अर्थात भारतीय हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज गुरुवारसाठी रायगड, रत्नागिरीसह पुणे व साताराच्या घाटमाथ्यावरील परिसरांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरात आकाश साधारणपणे ढगाळ असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता!

त्याचबरोबर, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असून मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट!

ऑरेंज अलर्ट- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, सातारा घाटमाथा

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट

पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा

वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदडे, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम. यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

धरणक्षेत्रात संततधार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या समाधानकारक पाऊस होत आहे. गेल्या दोन दिवसांत धरणांतील पाण्याची पातळी दोन टक्क्यांनी वाढल्याने 23 हजार दशलक्ष लिटर पाणी जमा झाल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धरणक्षेत्रात म्हणावा तसा पाऊस अद्याप आलेला नाही. फक्त पावसाच्या काही सरी कोसळत असल्याचे सांगितले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+