Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुढील 4 दिवस महाराष्ट्रात पावसाचा कहर! मुंबई-रायगडला रेड अलर्ट, जाणून घ्या कुठे कसा पडणार पाऊस!

Maharashtra Weather Update : गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः कोकणपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर असणार आहे.

Maharashtra Weather Update

हवामानाचा अंदाज

अरबी समुद्राच्या ईशान्य भागात सक्रिय झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे कोकण आणि गोवा भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि रायगड जिल्ह्याला 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे, तर पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.

१६ ऑगस्ट

रेड अलर्ट: मुंबई आणि रायगड.

ऑरेंज अलर्ट: ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, आणि कोल्हापूर घाटमाथा.

यलो अलर्ट: सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, आणि गडचिरोली.

१७ ऑगस्ट

ऑरेंज अलर्ट: मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकणपट्टा. तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथा.

यलो अलर्ट: नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलढाणा, जळगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, आणि गडचिरोली.

१८ ऑगस्ट

ऑरेंज अलर्ट: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा, बीड आणि लातूर.

यलो अलर्ट: मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव आणि हिंगोली.

१९ ऑगस्ट

ऑरेंज अलर्ट : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा.

यलो अलर्ट: मुंबई, धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, तसेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली.

पुढील तीन ते चार तासांत मुंबईसह मराठवाडा, विदर्भ आणि कोकणपट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+