Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Weather : 10 जिल्ह्यांना पाऊस झोडपणार! फेंगल चक्रीवादळाचा परिणाम! कुठे होणार बरसात? वाचा

Maharashtra Weather Update : श्रीलंकेत थैमान घालणारे 'फेंगल' चक्रीवादळ तामिळनाडू आणि दक्षिणेतील इतर राज्यात धडकले. किनारपट्टी भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर आता या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात जाणवत आहे. यामुळे पुण्यासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे, कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात गेले काही दिवस थंडीचा कडाका होता. नाशिकच्या निफाडमधील तापमान तब्बल दहा अंशाच्या खाली गेले होते. त्यामुळे गारठ्याची स्थिती राज्यात होती, पण गेल्या दोन दिवसांत गारठा कमी झाला आहे तर आता दुसरीकडे पाऊस बरसणार आहे.

Maharashtra Weather Update

थंडीचा जोर झाला कमी

हवेतील कमी झालेली आर्द्रता, कोरडे वातावरण व उत्तरेकडून येणारे वारे यामुळे राज्यात गारवा वाढला होता. गेले काही दिवस कडाक्याची थंडी नागरिक अनुभवत होते. मात्र, पुण्यात आणि नाशिकमध्ये महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमान नोंदवले गेले होते. आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे वातावरणात बदल होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे.

कुठे कसे हवामान

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार पुण्यात रविवारी 13.3 अंश सेल्सियस, तर सोमवारी 17.4 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत शहरातील तापमान 7 अंश सेल्सियसने वाढल्याचे दिसून येत आहे.

ठळक घडामोडी

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान

गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे.

गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस) खालीलप्रमाणे

मुंबई (कुलाबा) 22.8 सांताक्रूझ 20.6, अलिबाग, रत्नागिरी 23.9, डहाणू 19.8, पुणे 17.4 लोहगाव 19.3, जळगाव 14.8, कोल्हापूर 21.7, महाबळेश्वर 16.4, नाशिक 14.6, सांगली 20.3, सातारा 21.5, सोलापूर 21.0, छत्रपती संभाजीनगर 20.6, परभणी 19, बीड अकोला 21.7, अमरावती 19.7 बुलढाणा 19.2, ब्रम्हपुरी14.5, चंद्रपूर 16.0, गोंदिया 18.6, नागपूर 18.4, वाशिम 14.6, वर्धा 18 अंश सेल्सियस इतके तापमान आहे.

कुठे पडू शकतो पाऊस

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाचे क्षेत्र उत्तर तामिळनाडूवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आर्द्रता व दमटपणा वाढत आहे. पुण्यात तीन दिवस ढगाळ वातावरण राहील. पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, धाराशीव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी 5 डिसेंबरला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह नांदेड, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+