Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गारठा वाढला, तापमान घसरले! पुणे, मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका, कसे आहे आजचे हवामान? जाणून घ्या

Maharashtra Weather Update : राज्यात नव्या वर्षात थंडीचा कडाका सुरु झाला असून किमान तापमानात घट झाल्याने गायब झालेली थंडी आता पुन्हा परतली आहे. दिवसा उष्णता आणि रात्री थंडी अशी स्थिती सध्या आहे.

महाराष्ट्राचे तापमान जवळपास तीन ते चार अंशांनी घसरले. त्यामुळे काल 3 जानेवारीपासून थंडीत वाढ झाली आहे आणि ही स्थिती अशीच काही दिवस राहू शकते. मात्र, 14 जानेवारीपासून थंडी कमी होण्यास सुरुवात होणार आहे.

Maharashtra Weather Update

येत्या दोन दिवसांत तापमान आणखी घसरणार

राज्यात येत्या दोन दिवसांत तापमान अजून घसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा थंडी जाणवत आहे. यात पहाटेची थंडी जास्त जाणवत आहे.
काही ठिकाणी तापमान दहा अंशांच्या खाली आले तर पुण्यात जवळपास 11.7 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले आहे.

उत्तर भारतात काय आहे स्थिती

संपूर्ण उत्तर भारत, जम्मू आणि काश्मीरपासून दिल्लीपर्यंत दाट धुक्याने झाकोळले आहे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशातील बहुतांश भागात कडाक्याच्या थंडीमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शनिवारी, 4 जानेवारी रोजी सलग दुसऱ्या दिवशी उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये दाट धुके होते. भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. IMD नुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दिल्लीत 6 जानेवारीपर्यंत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दिल्लीत आज हवामान कसे असेल?

आज 4 जानेवारी 2025 रोजी दिल्लीचे तापमान 20.05 अंश सेल्सिअस आहे. दिवसाचे किमान तापमान 10.05 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 25.93 अंश सेल्सिअस राहील. दिल्लीत आज आकाश ढगाळ राहील. दिल्लीत शनिवारी सकाळी धुक्याची दाट चादर होती, काही भागात दृश्यमानता शून्य झाली होती, हवामान खात्याने दिवस ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

भारत हवामानशास्त्र विभाग (IMD) ने सांगितले की दिल्लीचे किमान तापमान 7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान कार्यालयाने सांगितले की दिल्लीच्या IGI विमानतळावर खूप दाट धुके होते, दृश्यमानता 0 मीटर इतकी नोंदवली गेली. त्यामुळे सर्व धावपट्ट्या CAT-III नियमांनुसार काम करत आहेत. ही एक नेव्हिगेशन प्रणाली आहे जी विमानांना कमी दृश्यमानतेमध्ये उतरण्यास मदत करते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+