पुन्हा थंडीने जोर धरला! आज 3 ते 4 अंशांनी तापमान कमी होणार, जाणून घ्या- आज कुठे पाऊस पडणार

Maharashtra Weather Update : फेंगल चक्रीवादळाच्या परिणामानंतर राज्यात येत्या 24 तासांत गारठा वाढू लागणार आहे. येत्या 4 दिवसात महाराष्ट्रात तापमानात घट होणार असून 3 ते 4 अंशांनी तापमान कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

विशेष बाब म्हणजे आज दिवसभरात पुण्यात 14 ते 15 अंश सेल्सियस तापमान राहण्याचा अंदाज आहे. आजपासून महाराष्ट्रात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता IMD विभागाने वर्तविली आहे.

Maharashtra Weather Update

राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होते. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. थंडीचा जोर पूर्णपणे कमी झाला, तर काही भागात उकाडा जाणवू लागला आहे.

उद्या अर्थात 9 डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहील अशी शक्यता हवामाना विभागाने वर्तविलेली आहे. तर 8 डिसेंबरपासून पुन्हा तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढणार आहे.

मराठवाड्यात तापमान घटणार

फेंगल चक्रीवादळाच्या इफेक्टनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान घटणार असून हवामान शुष्क आणि कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

किमान तापमानात 3-4 अंशांनी घट होणार असून येत्या 24 तासांत तापमानाचा पारा घसरणार आहे. दरम्यान, पुण्यात आज 14 ते 15 अंश सेल्सियस तापमानाची शक्यता आहे.

अहमदनगर- 21
छत्रपती संभाजी नगर- 20
जळगाव - 19
नागपूर -20
नाशिक 18
धाराशिव 23
उर्वरित भागात तापमान 20 ते 22° पर्यंत नोंदवले.

विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज

राज्यात आता पावसाला पोषक स्थिती कमी झाली असली तरी आज दि8 डिसेंबर रोजी विदर्भात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज पूर्व व पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात किमान तापमानात येत्या चार दिवसात फारसा बदल होणार नसल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. दोन दिवसांनी तापमान 2-3 अंशांनी घसरू शकते असा अंदाज देण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+