महाराष्ट्रासह देशभरातील कसं असेल तापमान, कुठे पडणार पाऊस तर कुठे असेल सर्वाधिक थंडी, वाचा सविस्तर
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर काहीसा ओसरला असून किमान तापमानात वाढ झालेली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासात पुढे सरकणार असून पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून पुढील दोन दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.
विदर्भात 24,25 डिसेंबरला पावसाची शक्यता
दिवसेंदिवस राज्यातील किमान तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विदर्भात 24 व 25 डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही आर्दता वाढणार असून काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कडाक्याच्या थंडीला ब्रेक मिळणार असून तापमानात काहीशी वाढ होणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलंय.

राज्यात पुढील 5 दिवस कसे राहिले हवामान?
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार,उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजे, जम्मू काश्मीर,हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम आहे.
कोरड्या वाऱ्यांचा झोत महाराष्ट्राकडे असल्याने राज्यात गारठा जाणवत असून पहाटे दाट धुकं आणि कडाक्याची थंडी आहे.तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
पूर्व व पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात येत्या 4-5 दिवसात किमान तापमान चढेच असेल. येत्या 24 तासांत किमान तापमानात हळूहळू 2-4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुढील पाच दिवस बहुतांश राज्यात थंडीचा जोर कमी होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
उत्तरप्रदेशात या कालावधीत पावसाची शक्यता?
IMD नुसार, 26 ते 28 डिसेंबर दरम्यान उत्तर प्रदेशात पाऊस पडू शकतो. त्यानंतर उत्तर प्रदेशात थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे. उत्तर प्रदेशात आज हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय 23, 24 आणि 25 डिसेंबर रोजीही हवामान स्वच्छ राहील. 26 डिसेंबरच्या पावसानंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक परिणाम पश्चिम उत्तर प्रदेशात दिसून येईल.
देशभरात कुठे कसे असेल तापमान?
दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, झारखंड आणि उत्तर भारतातील इतर अनेक राज्यांमध्ये तीव्र थंडी कायम आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) थंडीची लाट आणि धुक्यासाठी अलर्ट जारी केला आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो, त्यामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications