राज्यात पुन्हा वादळी वा-यासह मुसळधार पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई : राज्यात पावसाने काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालं आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी-वा-यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी, वार-यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

राज्याच्या या भागात पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, जळगाव,पुणे, सातारा आणि सांगली जिल्हाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट तर उत्तर महाराष्ट्रासह मुंबई ठाणे पालघर वगळता संपूर्ण राज्याच आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 19, 2024
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान बांगलादेशच्या दक्षिण भाग आणि नजीकच्या भागावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, हवामानाची ही दिशा येत्या काळात वायव्येकडे सरकण्याची शक्यता व्यक्त वर्तवण्यात येत आहे. तसेच तामिळनाडू आणि कोमोरिनपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारल्यामुळे देशासह राज्यभर पुन्हा एकदा पावसाची कृपा होताना दिसेल.












Click it and Unblock the Notifications