Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पावसाचा हाहाकार! रायगड जिल्ह्यात दरड कोसळली 1 ठार, वाशिममध्ये तरुण बुडाला!

रायगड/ वाशिम : राज्यात सर्वदूर पाऊस पडत असून रायगड जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात सूरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ताम्हिणी घाटात दरड कोसळली असून यात एकाचा मृत्यू झाला, तर वाशिम जिल्ह्यातही एक जणाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

सावित्री, कुंडलिका, आंबा नदीने धोका पातळी ओलांडली

रायगड जिल्ह्यात सूरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री, कुंडलिका, आंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड, रोहा, पाली, नागोठणे येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाताळगंगा नदीच्या पातळीत मोठी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केली आहे.

Maharashtra Weather Update 1 killed in landslide in Raigad

ताम्हिणी घाटात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.. अजूनही सर्वत्र जोराचा पाऊस कोसळत आहे. सध्या तिथे आपत्ती व्यवस्थापन सुरु असून घटनास्थळी प्रशासनाकडून पाहणी करण्यात येत आहे.

वावे, कोलाड गावात पाणी घुसले

Maharashtra Weather Update 1 killed in landslide in Raigad

आज पहाटे कुंडलिकेने धोक्याची पातळी ओलांडल्यानं रोहयातील सखल भाग, वावे, कोलाड गावात पाणी घुसले आहे..
लोणावळ्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने खोपोली, खालापूर परिसर जलमय झाला आहे..नागोठण्यात ही आंबा नदीचे पाणी घुसले आहे.

वाशिम जिल्ह्यात एकाचा मृत्यू

वाशिम जिल्हातील कोठारी तामंगरूळपीर येथील मारोती नारायण डाखोरे अंदाजे वय (36) वर्ष हे 24 जुलै रोजी सायंकाळी गावा शेजारील गाव तलावात बुडाला. या घटनेची माहीती मिळताच मंगरूळपीर तहसीलदार शितल बंडगर यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन चे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले.

Heavy rains in Washim  Kolhapur  one drowned in lake

उशिरापर्यंत शोध घेतला पण उपयोग झाला नाही. त्यानंतर आज सकाळी सात वाजता मंगरूळपीर शाखा पथकाने सकाळी साडेआठच्या सुमारास 20 फुट खोल पाण्यातील खाली तळाशी गाळात असलेला मृतदेह शोधून वर आणला. वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून संतत धार सुरू असलेल्या पावसाने वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्प हा ओसंडून वाहत आहे.

राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडला

Maharashtra Weather Update 1 killed in landslide in Raigad

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण शंभर टक्के भरले आहे. आज सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी राधानगरी धरण पूर्ण भरल्यानंतर सहाव्या क्रमांकाचा दरवाजा उघडला. त्यामुळे नदीपात्रात 2928 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

आज सकाळी पंचगंगेची पाणी पातळी 43 फूट झाली असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे कोल्हापूरला महापुराचा विळखा बसला आहे. पूरग्रस्त भागातून नागरीकांचे स्थलांतर सुरू असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला वरदायीनी ठरलेले आणि राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असलेले 8.36 टी.एम.सी. क्षमतेचे राधानगरी धरण निम्म्या जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासह कृषी औद्योगिक विकासाचा केंद्रबिंदू असलेले राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले. आज सकाळी 10 वाजून 6 मिनीटांनी धरणाचा सहा नंबरचा दरवाजा खुला झाला असून या दरवाजामधून 1428 व विजगृहातून 1500 क्युसेक्स, असा एकूण 2928 क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. यामु नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+