मराठवाड्यासह 'या' जिल्ह्यात जोरदार पाऊस! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आज कुठे बरसणार सरी? वाचा
Maharashtra Weather Today : मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पाऊस पडण्याची आज २२ शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे, त्यानुसार आता या ठिकाणी पावसाची परिस्थिती असून मराठवाड्यात पहाटेपासूनच मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे, यादरम्यान विजांचा कडकडाटही सुरु आहे.

राज्यात गणेशउत्सवाच्या पुर्ण दहा दिवसांत जोरदार पाऊस झाला बप्पा शेतकऱ्यांना पावला. आता दुर्गादेवी नवरात्र उत्सवातही पावसाचा जोर कायम असून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह काही जिल्ह्यात मुसळधार आणि इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. तसा अंदाजही हवामान विभागाचा होता.
या जिल्ह्यात मेघगर्जना, विजांसह पाऊस
कोकण गोवा आणि पालघर ठाणे मुंबई , रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, जालना येथे तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह ताशी तीस ते चाळीस किमी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील या जिल्ह्यात पावसाला सुरुवात
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर , जालना येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, त्यानुसार, आज पहाटेपासून छत्रपती संभाजीनगर येथे जोरदार पाऊस पडत असून कालपासून या परिसरात खूप उकाडा जाणवत होता, आज पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा आला आहे. यादरम्यान पाऊस सुरुच आहे.
या घाट विभागासह, जिल्ह्यांत पाऊस
पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग, सातारा जिल्ह्याचा घाट विभागासह, मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली , नांदेड येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना, ताशी तीस ते चाळीस किमी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशीव येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह ताशी तीस ते चाळीस किमी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज गडचिरोली आणि यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असे पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
पुणे व आसपासचा परिसर
आजपासून पुढील दोन दिवस हवामानाची स्थिती पाहता आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते अति हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications