Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra weather : पुढचे 3 दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार, या जिल्ह्यांना येलो अलर्ट

Maharashtra weather : राज्यात पुढील तीन दिवसांत पाऊस कोसळणार असून कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Maharashtra weather

विदर्भात कशी असेल पावसाची स्थिती?

पुढील चार ते पाच दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणून त्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

लातूर, धाराशीव, नांदेडमध्ये बरसणार सरी

पुढील तीन दिवस लातूर, धाराशिव तसेच उद्या सोलापूर, नांदेड येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्याच्या उर्वरीत जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे व परिसरात आज कसे राहील हवामान?

पुणे व आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यता ढगाळ राहणार आहे. यादरम्यान अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

आजपासून १५ ऑगस्टपर्यंत कसा आणि कुठे पडणार पाऊस

राज्यात ११ ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तर तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होऊ शकते.

१२ ऑगस्टला पावसाची कसा असेल पाऊस

१२ ऑगस्ट रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.

विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेनुसार विजांचा कडकडाट होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

१३ ऑगस्टला पावसाची कसा असेल पाऊस

१३ ऑगस्ट रोजी कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकटात होऊ शकतो. विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.

१४ ऑगस्टला पावसाची कसा असेल पाऊस

१४ ऑगस्ट रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या दोन्ही विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भाच बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहेत तर तुरळख ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे.

१५ ऑगस्टला पावसाची कसा असेल पाऊस

१५ ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.

सध्या मान्सूनचा प्रवास कसा आहे?

समुद्रसपाटीवरील मान्सूनचा ट्रॅक आता हरितकोट लुधियाना, नजीबाबाद, शहाजानपूर, बलिया, जलपाईगुडी आणि तेथून पूर्व ईशानेकडे अरुणाचल प्रदेशकडे सरकला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+