Maharashtra Weather: पुढचे 5 दिवस सावधान! राज्यात वादळी पाऊस गारपीटीचा अंदाज, वाचा कुठे होणार बरसात?
Maharashtra Weather : राज्यात ऐन उन्हाळ्यातच पावसाळा सुरु असल्याचा फिल येत आहे. अशातच आता येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे. यादरम्यान अवकाळी पावसासह गारपीटीचाही अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात सध्या ढगाळ वातावरण असून येथेही आज आणि आगामी काही दिवस पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?
मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, लातूर, जालना या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर येथे हलक्या स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.
विदर्भात कुठे पडणार पाऊस?
विदर्भात वाशिम, नागपूर, अकोला, गोंदीया, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा गडचिरोली आणि वर्धा येथे पावसाची आगामी चार दिवस शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात कुठे पडणार पाऊस?
मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली. कोल्हापूर येथे पावसाचा इशारा देण्यात आला . आगामी पाच दिवसांत येथे अवकाळी पाऊस कोसळू शकतो. यासह मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात बरसात होऊ शकते असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
पुण्यात काय आहे स्थिती?
पुण्यात ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे.पुण्यातील तापमानातही कमालीची घट दिसून आली आहे. येथे जवळपास तीस अंश सेल्सियसपर्यंत तापमान आहे.
काय आहे पावसाचे कारण
महाराष्ट्रासह छत्तीसगढ, मध्यप्रदेश येथेही पावासाचा अंदाज आहे. नैऋत्य राजस्थानपासून उत्तर झारखंडपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र पसरले आहे, जे वायव्य आणि पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगड सारख्या भागातून जात आहे. सध्याच्या पावसाळी आणि वादळी हवामानामागील हेच कारण आहे.












Click it and Unblock the Notifications