Maharashtra Weather Rain likely in Konkan Vidarbha Marathwada : 28 जुलै, सोमवारपासून वायव्य मध्य प्रदेश व लगतच्या पूर्व राजस्थानवर कमी दाबाचे क्षेत्र आहे, त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात आगामी चार पाच दिवस पावसाचेच राहणार आहेत.
कोकणसह या जिल्ह्यांना येलो अलर्ट
रायगड येथे पुढील दोन दिवस, रत्नागिरी येथे आज 29 तारखेला पुणे येथील घाट विभागासाठी आज 29 व उद्या 30 तारखेला आणि कोल्हापूर येथे आज व साताऱ्याच्या घाट विभागात पुढील दोन दिवस पूर्ण ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भातील जिल्ह्यांना चार ते पाच दिवस येलो अलर्ट दिला आहे.
पुणे व आजूबाजूच्या परिसर
पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील चार-पाच दिवस आकाश सामान्यः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात काल 28 ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडला असून आज 29 व उद्या 30 तारखेला घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवशी घाट विभागात येलो अलर्ट देण्यात आला असल्याचे पुणे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे.
Heavy to very heavy rainfall very likely to occur at isolated places in the ghat areas of North Madhya Maharashtra.
Heavy rainfall at very likely to occur at isolated places in the districts of Goa, North Konkan , Ghat areas of South Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 28, 2025
मुंबई वेधशाळेनेही उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली तर गोवा, उत्तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी एक्सवर पोस्ट केली आहे.
महाराष्ट्रात 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान कसे राहील हवामान?
महाराष्ट्रात 28 जुलै ते 1 ऑगस्ट या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची स्थिती राहील.
29 जुलै - कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भात मात्र काही ठिकाणीच पाऊस पडेल.
30 जुलै - कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून मध्य महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी पाऊस पडेल. या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
31 जुलै - कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे.
1 ऑगस्ट - कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशा अंदाज पुणे व्यक्त केला आहे.