Maharashtra weather 24 जिल्ह्यात पडणार पाऊस, विजांचा कडकडाट अन् सोसाट्याचा वाराही, वाचा हवामान अंदाज

Maharashtra weather : महाराष्ट्रात पावसाचे दिवस पुन्हा परतले आहेत, जवळपास २४ जिल्ह्यांत पाऊस कोसळणार असून विदर्भ आणि पुण्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज 7 ऑगस्ट रोजी कोकण, गोवा, मराठवाडा तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra weather

Take a Poll

आज सिंधूदुर्ग,सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशीव, लातूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किमी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस

रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे तसेच या जिल्ह्यांच्या घाट विभागात तर सांगली सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाटासह ताशी 30 ते 40 किमी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

विदर्भात कसे राहील हवाामान?

विदर्भात भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडासह मध्यम पावसाची शक्यता आहे, म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे व आसपासच्या परिसर

पुणे व आसपासच्या परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे तर दुपारी आणि संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अती हलका ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट घेण्यात आला आहे.

कसे राहील मुंबईचे हवामान?

मुंबईतही पावसाचा जोर जुलैच्या तुलनेत ओसरला आहे. त्यामुळे आताच्या हवामानाचा अंदाज पाहता, मध्यम हे हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण, मध्य, पश्चिम मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल असे हवामान विभागाचा अंदाज आहे.

दक्षिण मुंबई: गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, कुलाबा या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य मुंबई: दादर, सायन, कुर्ला, माटुंगा येथे ढगाळ वातावरण राहून हलका किंवा मध्यम पाऊस पडू शकतो.

पश्चिम उपनगरे: अंधेरी, विलेपार्ले, बांद्रा, खार या भागात पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे.

पूर्व उपनगरे: घाटकोपर, चेंबूर, भांडुप येथेही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई आणि ठाणे: वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, घणसोली आणि ठाणे परिसरात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

पालघर: किनारी भागात हलक्या सरी पडण्याची शक्यता असून, विशेषतः संध्याकाळच्या वेळी पावसाचा जोर वाढू शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+