Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज उद्या पावसाची शक्यता, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात कोसळतील सरी
Maharashtra Weather : पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज आणि उद्या सोसाट्याचा वारा मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कालही मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. ऐन उन्हाळ्यात पावसाच्या शक्यतेने केळीसह इतर पिकांचे नुकसान होत आहे.

कुठे कसे राहील हवामान, कुठे पडणार पाऊस
मुंबई
मुंबईत 15 एप्रिल रोजी आकाश अंशतः ढगाळ राहील, तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. पावसाची शक्यता नाही.
मध्य महाराष्ट्र
24 ते 39 अंश सेल्सिअस, तापमान राहण्याची शक्यता आहे तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे येथे उष्ण आणि दमट परिस्थिती राहील. दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 14, 2025
मराठवाडा
मराठवाड्यात 28 ते 40 अंश सेल्सिअस तापमान राहील यासह नांदेड, लातूर, धाराशिव येते तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वारे यामुळे शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 14, 2025
विदर्भ
विदर्भात 30 ते 42 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. यासह विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील. नागपूर, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
- गेल्या 24 तासांतील पाऊस आणि तापमान
- मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडला.
- मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक
- ठिकाणी पाऊस पडला.
- कोंकण गोवा व विदर्भात हवामान कोरडे
- होते.
- कोंकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
- उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या आसपास होते.
गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा) ३३.६, सांताक्रूझ ३३.२. अलिबाग रत्नागिरी ३३.६, पणजी (गोवा) ३४.२, डहाणू ३५.५, पुणे ३८.५, लोहगाव ४०.८. अहिल्यानगर, जळगाव ३९.०, कोल्हापूर ३८.४, महाबळेश्वर ३१.९, मालेगाव ४१.८, नाशिक ३८.१, सांगली ३८.८. सातारा ३८.२, सोलापूर ४१.०, धाराशिव ३९.६, छत्रपती संभाजीनगर ३९.९, परभणी ४०.६, नांदेड बीड अकोला ४२.४, अमरावती ४१.२, बुलढाणा ३८.२, ब्रह्मपुरी चंद्रपूर ४२.२, गोंदिया ३८.५, नागपूर ४१.०, वाशिम ४१.४, वर्धा ४०.०, यवतमाळ ४१.५.
कुठे आहे सर्वात जास्त तापमान?
राज्यात एकीकडे पावसाचा शिडकावा असला तरीही काही ठिकाणी तापमानाचा पारा वाढलेला आहे. यामध्ये सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे ४२.४ अं. से. नोंदवले गेले. तर विदर्भातील तापमान चांगलेच वाढलेले आहे.












Click it and Unblock the Notifications