राज्यात मान्सूनला अनुकूल स्थिती, मुंबई, ठाण्याला आज ऑरेंज अलर्ट; जाणून घ्या आज कुठे कुठे पडणार पाऊस?
Maharashtra Weather : राज्यात मान्सूनला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे मुंबईसह ठाण्याला आज ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. पुणे, सातारासह सहा जिल्ह्यात आज चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर कोकणातजोरदार आणि वादळी पावसाची शक्यता आहे.
मुंबईत गुरुवारी पाऊस पडल्यानंतर आज सकाळी ढगाळ वातावरण होते त्यानंतर पावसाची शक्यता मुंबई आणि ठाणे येथे आहे. हवामान विभागाने या शहरांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज सकाळी पाऊस जरी झाला नाही तरीही दिवसभरात किंवा रात्रीतून मुंबईत पावसाची शक्यता आहे.

कोकण
रत्नागिरी-रायगडला रेड अलर्ट
कोकणात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने रत्नागिरी-रायगडला रेड अलर्ट दिला असून पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचे पुनरागमन होऊ शकते. सिंधूदुर्गमध्येही जोरदार पाऊस पडू शकतो. जूनच्या मध्यावर मान्सून उद्यापासून राज्यात सक्रीय होणार आहे. सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
मराठवाडा
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, आणि नांदेड जिल्ह्यात आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तर काही ठिकाणी विज आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो.
विदर्भ
विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. येथे काही जिल्ह्यात मान्सून बरसू शकतो तशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
उत्तर महाराष्ट्रात पाऊस
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अहिल्यानगर, धुळे आदी ठिकाणी तुरळक पाऊस होऊ शकतो. तर विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
राज्यात १५ जूननंतर पेरणी करावी तूर्त घाई नको
कृषि विभाग वेळोवेळी पाऊस आणि पिक पाण्यासंदर्भात सल्ला देत असून मान्सून सक्रीय झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला राज्याच्या कृषि विभागाने दिला आहे.












Click it and Unblock the Notifications