Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबईसह 'या' शहरात आज अति जोरदार पाऊस होणार! 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पुण्यात कसा असेल पाऊस? वाचा

Maharashtra Weather : वायव्य बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आज ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले असून ते उत्तर ओडिशा किनारपट्टीवर स्थित आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात आज बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.

Maharashtra Weather Orange alert for 8 districts

नाशिकसह या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

आज ४ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात अति जोरदार तर धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्याच्या मैदानी भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईसह या शहरात जोरदार पाऊस होणार

आज ४ सप्टेंबर रोजी मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा, जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार तर जळगाव, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया व नागपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Take a Poll

पुणे व आसपासच्या परिसर

पुणे व आसपासच्या परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल तसेच घाट विभागात आज तुरळक ठिकाणी जोरदार तर उद्या अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे विभागाच्या घाट विभागाला आज ऑरेंज देण्यात आला आहे.

मान्सूनचा शेवटचा टप्पा

सध्या मान्सूनचा शेवटचा टप्पा सुरू असून, त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही (२ सप्टेंबर) अनेक राज्यांत पावसाची शक्यता असून, यासाठी भारतीय हवामान विभागाने (IMD) अलर्ट जारी केला आहे. यामध्ये दिल्ली-एनसीआरचाही समावेश आहे.

महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भाग जलमय झाले आहेत. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात ८ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज आणि उद्या, म्हणजेच ४ आणि ५ सप्टेंबर रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. आगामी काही दिवस राज्यासाठी पावसाचेच असतील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : मुंबईत एवढा पाऊस का पडतोय? जाणून घ्या कारणं.. हवामान विभागाची मोठी अपडेट! 'या' भागात पुरांचा धोका

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+