Maharashtra Weather विदर्भात 6 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार! जाणून घ्या राज्यातील हवामान
Maharashtra Weather : महाराष्ट्रात आगामी काही दिवस पाऊस संथवणार असून सात ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता तुलनेत कमी आहे. काही विशिष्ट जिल्ह्यात येलो अलर्ट असेल मात्र, उर्वरित ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यात आज विदर्भातील सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

आज ३ ऑगस्ट रोजी भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेच्या व्यक्त केली आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसर
पुणे आणि आसपासच्या परिसरात आज आणि उद्या आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोकण
कोकणात आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
विदर्भ
विदर्भात आज काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
४ ऑगस्टला कसे राहील हवामान
४ ऑगस्टला कोकणात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्ता आहे, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
५ ऑगस्टला कसे राहील हवामान
५ ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्ता आहे, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
६ ऑगस्टला कसे राहील हवामान
६ ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्ता आहे, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications