Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यात 'या' भागात आज मुसळधार बरसणार! 27 जिल्ह्यांना 'येलो' अलर्ट! मुंबई-पुण्यात कसा असेल पाऊस? वाचा

Maharashtra Weather Heavy rains in Mumbai Thane : राज्यात पाऊस पुन्हा हळूहळू जोर धरत आहे, आज 14 ऑगस्ट 2025 रोजी कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तसेच मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान राज्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल तर वारे ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वाहण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

आज 14 ऑगस्ट रोजी अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान वादळी वारे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतात, म्हणून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Heavy rains in Mumbai Thane

मुंबई, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यांत मुसळधार बरसणार, येलो अलर्ट

  • आज ठाणे, मुंबई, रत्नागिरी व सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूरचा घाट विभाग आणि साताऱ्याचा घाट विभागात, रायगड, पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, जालना, बीड, अकोला, बुलढाणा, गडचिरोली, लातूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहून पाऊस पडण्याची हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • भंडारा गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, म्हणून सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे व परिसरात कसे राहील हवामान?

आज पुणे व परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते अती हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे घाट विभागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट व 30 ते 40 किलोमीटर प्रति वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Heavy rains in Mumbai Thane

मुंबई हवामान विभागाचा अंदाज काय?

मराठवाडा

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे येण्याची शक्यता आहे.

कोकण-गोवा

कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस, ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे येण्याची शक्यता आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र

उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस, ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे येण्याची शक्यता आहे.

विदर्भ (नागपूर हवामान विभागाच्या अंदाजानुसार..)

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे नागपूर हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+