राज्यात आज जोरदार पाऊस कोसळणार! मुंबई, ठाण्यासह 12 जिल्ह्यांत मुसळधार, ऑरेंज अलर्ट घोषित
Maharashtra Weather Heavy rains expected today : गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर असून आज 17 ऑगस्ट रोजीही जोरदार पाऊस कोसळणार आहे, यादरम्यान मुंबई, ठाण्यासह राज्यातील 12 जिल्ह्यांत मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार असून या जिल्ह्यांना पुणे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, त्याचा परिणाम महाराष्ट्रात जाणवत आहे.

पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात रेड अलर्ट
आज 17 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते खूप मुसळधार तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून या भागात रेड अलर्ट ठिकाणी देण्यात आलेला आहे.
हवामान अद्यतन - प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई. pic.twitter.com/do7FdHuJZ7
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 16, 2025
व्हिडिओ सौजन्य - मुंबई हवामान विभाग
'या' जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट!
अति मुसळधार सरी कोसळणार
- पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग येथे काही ठिकाणी मुसळधार ते खूप मुसळधार पाऊस करण्याची शक्यता आहे; तर सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते खूप मुसळधार तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट!
जळगाव, नाशिक, छत्रपती नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम येथे मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना येलो देण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणून त्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुणे आणि परिसर
पुणे व परिसरात आजपासून पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहील. यादरम्यान अति हलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१६-२१ ऑगस्ट २०२५ दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील हवामानाची शक्यता आहे:
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 16, 2025
या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील लगतच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई हवामान विभागाचा अंदाज काय?
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, त्याचा प्रभाव कोकणात दिसून येत आहे, काल ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यानंतर आता मुंबईसह कोकणात 16 ऑगस्टपासून पुढील चोवीस तासांसाठी रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर हा अलर्ट 17 ऑगस्टला दुपारनंतर परिस्थितीनुसार, ऑरेंजमध्येही बदलेल.
मुंबई, ठाणे, कोकणासह रायगड आणि नाशिकच्या घाट विभागात पुढील चोवीस तासांत बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या काही दिवसात बंगालच्या उपसागराच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा कोकणात प्रभाव राहील अशी माहिती मुंबईच्या हवामान विभाग प्रमुख शुभांगी भुते यांनी दिली आहे.
-
Devendra Fadnavis : गॅस टंचाईची भीती हा काँग्रेसचा कुटील डाव; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप -
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
पालकांकडून मिळालेल्या धड्यांनी माझ्या नेतृत्वाचा दृष्टिकोन घडवला: करण अदानी -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल! -
महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय! अदानी फाऊंडेशन भारतातील 10 लाख महिलांना देणार उद्योजकतेचे बळ -
होर्मुझची कोंडी, युएईचा 'मास्टरस्ट्रोक'; इराण-इस्रायल युद्धाच्या सावटात भारतासाठी नवे ऊर्जा द्वार! -
'धुरंधर-2' साठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; रणवीर सिंहच्या स्पाय-ॲक्शन थ्रिलरचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू! -
Maharashtra weather update: एकीकडे महाराष्ट्र तापला! दुसरीकडे 'या' ठिकाणी पावसाचा इशारा -
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'ने मोडला पवन कल्याणचा रेकॉर्ड; पहिल्या दिवशी बाॅलीवूडला हादरवणारी 'एवढी' कमाई







Click it and Unblock the Notifications