Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Weather:राज्यात आज-उद्या जोरदार पाऊस होणार! जाणून घ्या, तुमच्या विभागातील पावसाची स्थिती

Maharashtra Weather : मान्सूनने कोकणातील देवगडमध्ये हजेरी लावली, या आनंदवार्तेने महाराष्ट्राला दिलसा मिळाला आहे. यातच मान्सून आणि मान्सूनपुर्व पावसाची सरमिसळ झाली असून हवामान विभागाने 31 मे पर्यंत पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान आज २६ मे आणि उद्या २७ मे रोजी महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Maharashtra Weather

Photo - AI

कोकण

आज २६ मे आणि उद्या २७ मे रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यानंतर ३१ मे पर्यंत पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र

मध्य महाराष्ट्रात आज २६ मे रोजी बऱ्याच ठिकाणी तर उद्या २७ मे रोजी काही ठिकाणी र पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यानंतर ३१ मे पर्यंत पावसाची सर मध्य महाराष्ट्रात राहील.

मराठवाडा

मराठवाड्यात आज २६ मे रोजी बऱ्याच ठिकाणी तर उद्या २७ मे रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भ

विदर्भात आज २६ मे रोजी काही ठिकाणी तर उद्या २७ मे रोजी बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच काळात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

पुण्यात आज उद्या कसे राहील हवामान

पुण्यात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहील तसेच मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ मे आणि त्यानंतर ३१ मे पर्यंत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

ठळक घडामोडी

गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान

  • मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडला.
  • कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला,
  • मराठवाड्‌यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला.
  • गोव्यासह संपूर्ण राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई (कुलाबा) ३२.०, सांताक्रूझ ३४.७, अलिबाग ३२.३, रत्नागिरी २५.६, पणजी (गोवा) २९.४, डहाणू ३२.२. पुणे २६.६, लोहगाव २७.६, अहिल्यानगर, जळगाव ३४.८, कोल्हापूर २५.४. महाबळेश्वर १९.४, मालेगाव ३५.४. नाशिक २९.९, सांगली २६.५. सातारा सोलापूर २८.६. धाराशिव २८.४. छत्रपती संभाजीनगर ३१.२. परभणी ३०.७. नांदेड, बीड अकोला ३२.६, अमरावती ३१.६. बुलढाणा २९.०, ब्रह्मपुरी ३२.६, चंद्रपूर ३४.२, गोंदिया ३२.८, नागपूर ३३.०, वाशिम ३०.०, वर्धा ३२.५, यवतमाळ २९.०.

राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मालेगाव येथे ३५.४ अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+